Karnataka VidhanSabha Election Result 2023  Sarkarnama
देश

Karnataka Election Result 2023 LIVE : कर्नाटकातील या महत्वाच्या जागांवर कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..सविस्तर वाचा

Karnataka VidhanSabha Election Result 2023 : जगदीश शेट्टर भाजप सोडल्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर येथून लढत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka VidhanSabha Election Result 2023 : कर्नाटकातील दहा महत्त्वाच्या जागांवर देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदार संघात बड्या व्यक्तींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Karntaka vidhan sabha election prediction BJp challenges Explained )

कनकपुरा– या मतदारसंघात अद्याप भाजपचं खातं उघडलेलं नाही. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने येथे मंत्री आर अशोक यांना त्यांच्या विरोधात उभे केले आहे. शिवकुमार आघाडीवर आहे.

चन्नापट्टन – JDS प्रमुख एचडी कुमारस्वामी स्वत: या जागेवरुन उमेदवार आहेत. कुमारस्वामी यांच्या विरोधात भाजपने सीपी योगेश्वर यांना तर काँग्रेसने गंगाधर एस यांना तिकीट दिलं आहे. येथे कुमारस्वामी आघाडीवर आहे.

शिगगाव–या मतदारसंघातून मुख्यमंत्री बोम्मई रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने यासिर अहमद खान पठाण यांना तिकीट देण्यात आलं आहे. बोम्मई येथे 2008 पासून निवडून येत आहेत. बोम्मई येथे आघाडीवर आहेत.

हुबळी-धारवाड मध्य- कर्नाटकचे दिग्गज लिंगायत नेते जगदीश शेट्टर भाजप सोडल्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर येथून लढत आहेत. ते येथून 6 वेळा आमदार आहेत. या मतदार संघात भाजपने महेश तेंगीनाकाई यांना तिकीट दिलं आहे. शेट्टर येथे पिछाडीवर आहे.

चित्तपूर– काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे येथून निवडणूक लढवत आहे. प्रियांकाच्या विरोधात भाजपच्या मणिकंता राठोड आहेत.प्रियांक आघाडीवर आहे.

अथणी– माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे कर्नाटकातील अथणी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. लक्ष्मण सवदी यांनी नुकतेच भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपने येथून महेश कुमथल्ली यांना उमेदवारी दिली आहे.सवदी हे आघाडीवर आहेत.

विधानसभा निवडणूक २०१८ चा निकाल

एकूण जागा – २२२, बहुमताचा आकडा – ११३

भारतीय जनता पक्ष – १०४

काँग्रेस – ७८

जनता दल (एस) – ३७

मुख्यमंत्री – येदियुरप्पा आणि बसवराज बोम्मई भाजप

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT