Karnataka VidhanSabha Election Result 2023 :
Karnataka VidhanSabha Election Result 2023 :  Sarkarnama
देश

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत, 115 जागांवर आघाडी

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभेच्या सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे.काँग्रेस-भाजपमध्ये चुरस वाढली आहे. काँग्रेसने आघाडीचं शतक गाठलं.

कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली.

कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभेचे 200 कल हाती आले असून काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसनं शतक पूर्ण केलं आहे. 100 जागांवर काँग्रेस आघाडीवर असून भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे.

  • चित्तापूरमध्ये प्रियांक खरगे आघाडीवर

  • येदीयुरप्पांचा मुलगा शिकारीपुरात आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT