KCR - Uddhav Thackeray
KCR - Uddhav Thackeray  Sarkarnama
देश

महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात होते त्याचा शेवट यशस्वीच असतो; मुख्यमंत्री केसीआर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी वर्षा बंगल्यावर दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. यानंतर दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर माहिती दिली. या भेटीवेळी खासदार संजय राऊत आणि दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता प्रकाश राज देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंशी बोलून प्रसन्न वाटलं. देशाचे राजकारण, देशाच्या विकासाची गती, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची अवस्था अशा वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली आणि जवळपास सर्वच विषयांवर सहमतीही झाली, असे मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. या पत्रकार परिषदेतही त्यांनी याचेच संकेत दिले आहेत.

केसीआर पुढे म्हणाले, लवकरच हैदराबादमध्ये किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व जण भेटू आणि पुढील दिशा ठरवू. पण एक आंदोलन नक्की उभे करु. देशाला बदलाची गरज आहे. देशातील वातावरणाला खराब होवू द्यायचं नाही. अन्य लोकांशीही आम्ही बोलू. पण महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात होते त्याचा शेवट यशस्वीच असतो असे त्यांनी सांगत छत्रपती शिवाजी महाराजाच्या लढ्याचा संदर्भही दिला.

केसीआर यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने अनेक गोष्टी आमच्यासाठी सुकर झालेल्या आहेत. दोन्ही राज्यांमध्ये सामायिक अशी १००० किमीची बॉर्डर आहे. त्यामुळे ही दोस्ती निभवायची आहे. आज अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT