CM Arvind Kejariwal|
CM Arvind Kejariwal| 
देश

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; 'हरिजन' ऐवजी करणार 'डॉ. आंबेडकर' शब्दाचा वापर

सरकारनामा ब्युरो

Latest Delhi Political News

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे दिल्ली सरकारने 'हरिजन' (Harijan) शब्दाऐवजी आता 'डॉ. आंबेडकर' (Dr. Ambedkar) शब्द वापरण्याचा निर्णय घेतला आहे. समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल यांनी 'हरिजन' शब्दाऐवजी 'डॉ. आंबेडकर' शब्द वापरण्याची अधिसूचना जारी केली आहे. दिल्लीत लवकरच हा निर्णय लागू केला जाणार असल्याचे राजेंद्र पाल यांनी म्हटले आहे. (CM Arvind Kejariwal news)

केजरीवाल सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता दिल्लीतील वस्त्या आणि रस्त्यांना 'हरिजन' ऐवजी 'डॉ. आंबेडकर' शब्दाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी राजेंद्र पाल गौतम यांच्या नेतृत्त्वात दिल्ली सचिवालयात कायदा विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाल यांनी दिल्लीतील ज्या गल्ल्या, वस्त्या, दवाखाने आणि वसाहतींना 'हरिजन' शब्दाचा वापर केला आहे, त्यात बदल करुन त्याऐवजी त्या ठिकाणी 'डॉ. आंबेडकर' असा शब्द लिहीण्याचा प्रस्ताव सादर केला.

दिल्लीत कुठेही हरिजन हा शब्द वापरला जाऊ नये, अशी मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने दिली होती. या सूचनेनंतर दिल्ली सरकारने बोलवलेल्या बैठकीत 'हरिजन' या शब्दाच्या जागी 'डॉ. आंबेडकर' शब्द टाकण्याची अधिसूचना काढण्यात आली. तसेच ही अधिसूचना लवकरात लवकर लागू करण्याचेही निर्देश दिले आहेत.

केजरीवाल सरकारने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाई करून अधिसूचना जारी केली. त्यात, दिल्लीतील सर्व वसाहती, गल्ल्या आणि रस्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा, असा प्रस्ताव आम्ही मांडला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT