kerala Cabinet
kerala Cabinet Sarkarnama
देश

kerala Cabinet : राज्यपालांना हटविणार ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ; विधेयक आणणार..

सरकारनामा ब्युरो

kerala Cabinet : राज्यातील विद्यापीठाच्या कुलपतीपदावर शिक्षणतज्ज्ञ असावा, यासाठी केरळच्या मंत्रीमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वादावर यामुळे पडद्या पडणार आहे.

यासाठी केरळ मंत्रीमंडळाने विधिमंडळात एक विधेयक दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास राज्यपालांना कुलपती पदावरुन हटविण्यात येणार आहे. त्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

केरळ विधानसभेचे अधिवेशन ५ डिसेंबरपासून सुरु होत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रीमंडळाने आरिफ मोहम्मद खान यांना कुलपती पदावरुन हटविण्यासाठी विधेयक आणले जात आहे. आरिफ मोहम्मद खान यांना हटवून त्यांच्याजागी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञाना कुलपदी पदावर विराजमान करण्यात येणार आहे.

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे केरळमधील नऊ विद्यापीठाचे कुलपती आहे. त्यांच्यात आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या अजेंड्यावर काम करीत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.

याबाबत मुख्यमंत्री विजयन यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल हे त्यांच्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. लोकशाही मुल्याचा ते अवमान करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT