Kirit Somaiya on Yashwant Jadhav Sarkarnama
देश

किरीट सोमय्या दिल्ली दौऱ्यावर; मलिक, जाधव यांच्यानंतर मोहिम केली आणखी तीव्र

Yashwant Jadhav | Income Tax | Raid | Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचे लक्ष्य 'डर्टी डझन'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. ठाकरे सरकारच्या "डर्टी डझन" नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. काल सोमय्या यांनी ट्विट करुन १२ नेत्यांची नाव जाहिर केली होती. हे १२ नेते म्हणजे ठाकरे सरकारचे 'डर्टी डझन' असल्याचे सांगितले होते. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापासून हसन मुश्रीफ, अनिल परब, संजय राऊत (Sanjay Raut) अशा बड्या नावांचा समावेश होता.

सोमय्या यांनी यापूर्वी तक्रार केलेल्या नेत्यांपैकी मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख, भावना गवळी, यशवंत जाधव यांच्याभोवती कारवाईचा फास आवळला आहे. नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधिक लोक आणि मलिक यांच्यामध्ये जमिनीचे व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीला मिळाले असल्याचा दावा केला जात आहे. त्यांना ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आज सकाळी यशवंत जाधव(Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे.

यशवंत जाधव यांच्या घरावर ईडीचा छापा :

नवाब मलिक यांच्या नंतर दोनच दिवसात शिवसेना उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला आहे. सोबत CISF ची टीम देखील उपस्थित आहे. शेल कंपन्यांमधील गुंतवणूक, कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप, जवळपास १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि हे पैसे युएईकडे वळते केल्याबाबत आयकरकडून जाधव यांची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. सोबतच आयकर विभागाच्या हाती पुरावे देखील दिले होते. जाधव यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी आयकर विभागाकडे पाठपुरावा करणार असून त्यांना मदत करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले होते. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांच्या घरी छापेमारी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT