Koyal Mallik resignation Sarkarnama
देश

Rajya Sabha MP : संसद अधिवेशनाच्या चार दिवस आधीच खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; 'इंडिया आघाडी'ला धक्का

Koyal Mallik resignation, TMC MP, Trinamool Congress : तीन महिन्यांत चौथा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा; कोयल मल्लिक यांच्या निर्णयामुळे तृणमूलची ताकद झाली कमी, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण.

Rajanand More

Rajya Sabha resignation : संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. २०) सुरू होत आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. त्यावरून देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. मागीत तीन महिन्यांत लोकसभेतील तब्बल २६ खासदारांनी पक्ष बदलले असून राज्यसभेच्या तीन खासदारांनी राजीनामा दिला आहे. आता या राजीनाम्यामध्ये आणखी एका खासदाराची भर पडली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी (कोयल) मल्लिक यांनी गुरूवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसे पत्र त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना दिले आहे. मात्र, त्यांनी राजीनामा देण्यामागचे कारण सांगितलेले नाही. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

कोयल मल्लिक हा बंगालमधील प्रसिध्द अभिनेत्री आहेत. टॉली क्वीन म्हणून त्यांनी आपले नाव कमावले आहे. त्यांचे खरे नाव रुक्मिणी मल्लिक आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची संख्या नऊवर आली आहे. यापूर्वी सुखेन्दू शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बराईक यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आतापर्यंत राज्यसभेच्या चार खासदारांनी राजीनामा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या तीनही खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काही तासांतच त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. बंगालमध्ये आठ दिवसांनी तीन जागांसाठी मतदान होणार आहे. आता कोयल मल्लिक याही भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती.

कोयल यांनी ६ एप्रिल रोजीच राज्यसभेच्या सदस्याची शपथ घेतली होती. त्यांची ही राजकारणातील एन्ट्री होती. पण काही महिन्यांतच त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. ममतादीदींचे सर्वात जुने विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनी बुधवारीच पक्षातील सर्व पदांचे राजीनामे देत आमदारांच्या बंडखोर गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोयल यांनी राजीनामा दिला आहे. तृणमूलचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीच कोयल यांना राजकारणात आणल्याची चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT