Krishna Janmabhoomi case sarkarnama
देश

Krishna Janmabhoomi Case: कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह; युक्तीवाद पूर्ण, 'या' दिवशी होणार अंतिम फैसला

Krishna Janmabhoomi-Idgah Masjid Case: मथुरेत 11 एकरात श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आहे. शाही ईदगाह मशीद २.३७ एकरवर बांधली आहे. या संपूर्ण जमिनीच्या मालकीचा वाद अनेक दशकांपासून सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

Mathura News: मथुरा येथील शाही ईदगाह आणि श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी २० मार्च रोजी सुनावणी झाली. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती न्यासचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी (२५ मार्च ) पुढील सुनावणी होणार आहे. मथुरेत 11 एकरात श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आहे. शाही ईदगाह मशीद २.३७ एकरवर बांधली आहे. या संपूर्ण जमिनीच्या मालकीचा वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. या वादग्रस्त जमिनीप्रकरणी नुकतीच न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.

महेंद्र प्रताप सिंग यांनी शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाबाबत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात खटला दाखल केलेला होता. पण तो कनिष्ठ न्यायालयात तो फेटाळण्यात आला.यानंतर जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

जिल्हा सत्र न्यायालयाने ही याचिका अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग केली होती.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात या प्रकरणू सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.तर मुस्लिम बाजूच्या वतीनेही अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंतच्या सुनावणीत काय झाले

महेंद्र प्रताप सिंह यांनी 8 फेब्रुवारी 2023 रोजी दोन्ही बाजूंमधील वादात शाही ईदगाहचे सर्वेक्षण न्यायालयीन आयोगाकडे करण्याची मागणी केली. तसेच, सर्व पुरावे न्यायालयाकडे सोपवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं

सुनावणी दरम्यान हिंदू बाजूने आरोप करण्यात आला की, शाही ईदगाहचा विस्तार करण्यासोबतच मुस्लिम बाजूचे लोक तेथे असलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी अमीन यांच्या मदतीने मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली. या याचिकेला मुस्लीम पक्षाने न्यायालयात विरोध केला. 23 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला असून पुढील सुनावणी 15 मार्च रोजी ठेवण्याचा निर्णय घेतला. सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून पुढील सुनावणी 25 मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे.मात्र, हे प्रकरण सुनावणीयोग्य आहे की नाही, यावर आधी सुनावणी झाली पाहिजे,असा युक्तिवाद मुस्लीम पक्षाने केला आहे.

महेंद्र प्रताप सिंह यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, महसूल नोंदी दर्शवतात की खसरा खतौनी येथील 13.37 एकर जमीन जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर आहे. महापालिकेतही मुस्लीम पक्षाचे नाव नोंदवले जात नसल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. आजही जन्मभूमी ट्रस्ट इदगाह असलेल्या जमिनीचा कर भरत असल्याचा दावा केला आहे.पण पराभवाच्या भीतीने मुस्लीम पक्ष क्षुल्लक कारणे सांगून सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT