ED Raid In Delhi: माजी केंद्रीय मंत्री आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तियांवर ईडीने काल (शुक्रवारी) कारवाई केली. सक्तवसुली संचालनालयाने (ED) जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळाप्रकरणी मोठी छापेमारी केली आहे.
दिवसेंदिवस लँड फॉर जॉबच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी वाढतच आहेत. दोनच दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती.
या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी, कन्या मीसा भारती यांच्यासह १४ अन्य जणांना १५ मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सौम्या राघवन, सीपीओ कमलदीप मैनराय, लाभार्थी राजकुमार सिंह, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय कुमार, धर्मेंद्र कुमार, विकास कुमार, अभिषेक कुमार रवींद्र राय, किरण देवी, अखिलेश्वर सिंह, रामाशीष सिंह याचा या प्रकरणात समावेश आहे.
२००४ ते २००९ मधील हा प्रकार आहे. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती. यातील सात जणांना जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे चौकशीत आढळले आहे.
यातील पाच जमिनीची विक्री झाली होती. तर दोन जणांनी जमीन भेट म्हणून दिली होती. तीन ते पाच लाख रुपयांच्या भावात या जमीन लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराने खरेदी केल्याचे आढळले आहे. जमीनीच्या बदल्यात नोकरी म्हणून गाजलेल्या या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या परिवारावर ईडीने ही कारवाई केली.
ईडीने (ED) शुक्रवारी (10 मार्च) मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi)आणि पाटणा (Patna) येथे अनेक ठिकाणी या प्रकरणी कारवाई केली आहे. लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील 15 ठिकाणी ईडीच्या पथकानं छापे टाकल्याची माहिती आहे. ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील जवळपास १५ ठिकाणांवर छापे मारले.
लालू यादव यांच्या तीन मुलींच्या घरांवरही छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हेमा, रागिणी आणि चंदा यांचं घर दिल्लीत आहे, ज्यांच्या घरी ईडीकडून सध्या झाडाझडती सुरु आहे.
राजदचे माजी आमदार के अबू दोजाना (Abu Dojana) यांच्या पाटणा येथील घरीही छापेमारी सुरु आहे. ईडीचे पथक या ठिकाणी कसून चौकशी करीत आहे. आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.