5G Launch |
5G Launch | 
देश

5G Launch : देशात 5जी चे पदार्पण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या पर्वाचा शुभारंभ

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता औपचारिकपणे 5G इंटरनेट लॉन्च केला. 'इंडिया मोबाइल काँग्रेस-2022' च्या उद्घाटनानिमित्त हे प्रक्षेपण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात या शहरांमध्ये सुरु होणार सेवा

पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.

देशभरात सेवा कधी सुरू होईल

2023 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीपर्यंत रिलायन्स सर्व महानगरांमध्ये ही सेवा सुरू करू शकते.

नेटवर्कचा वेग

5G मुळे तुम्ही काही सेकंदात मोबाइल डिव्हाइसवर उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ किंवा चित्रपट डाउनलोड करु शकता. 5G इंटरनेटचा वेग सध्याच्या वेगापेक्षा 10-12 पट जास्त असेल.

खिशावरचा बोजा वाढेल का?

5G मध्ये दोन प्रकारच्या सेवा आहेत. स्टँडअलोन 5G आणि नॉन स्टँड अलोन. नॉन-स्टँड अलोन सेवा केवळ 4G संसाधनांद्वारे प्रदान केली जाईल आणि ती स्टँड अलोन 5G सेवेपेक्षा थोडी कमी असेल. पण तरीही ती 4G पेक्षा खूप वेगवान असेल. तर स्टँडअलोनमध्ये स्वतंत्र संसाधने जोडली जातील . ही सेवा जलद आणि महाग असेल. सर्वप्रथम जिओ ही सेवा देणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT