<div class="paragraphs"><p>Lavoo Mamledar</p></div>

Lavoo Mamledar

 
देश

ममतांना मोठा धक्का! आमदाराची पक्षप्रवेशानंतर तीनच महिन्यांत सोडचिठ्ठी

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत सुरू आहे. इतर पक्षांचे आमदार फोडून धक्का देणाऱ्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनाच आता मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केलेल्या आमदाराने तीनच महिन्यांत पक्षाला रामराम केला आहे. यामुळे तृणमूल काँग्रेस गोव्यात तोंडावर पडल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) आमदार लव्हू मामलतदार (Lavoo Mamledar) यांनी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. ते 2012 आणि 2017 मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या प्रवेशाने तृणमूलची गोव्यातील ताकद वाढली होती. आता त्यांनी अचानक तृणमूल सोडून ममतांना मोठा झटका दिला आहे. तृणमूलमध्ये सुरवातीला प्रवेश करणाऱ्या गोव्यातील नेत्यांमध्ये मामलतदार आघाडीवर होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला यामुळे मोठा फटका बसला आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला होता. नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. फलेरो यांना त्यानंतर दोनच महिन्यांत राज्यसभेची (Rajya Sabha) लॉटरी लागली होती. फलेरो हे तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) हेही नुकतेच तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. ते काँग्रेसचे कार्याध्यक्षही होते. लॉरेन्स यांनी 20 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. त्यांना काँग्रेस पक्षाचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर 24 तासांतच कोलकत्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश झाला होता. लॉरेन्स यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे गोवा विधानसभेतील संख्याबळ दोनवर आले आहे. लॉरेन्स हे दक्षिण गोव्यातील कुर्टोरीम मतदारसंघाचे आमदार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT