Justice Dinesh Sharma: दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात झालेल्या बदलीवरुन महाभारत सुरु असताना आता कलकत्ता उच्च न्यायालयात दिल्ली उच्च न्यायालयातून बदली झालेले न्यायाधीश दिनेश कुमार शर्मा यांच्या बदलीवरुन वकिलांनी रान उठवलं आहे. त्यांच्या बदलीवरुन वकिलाच्या संघटना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.
न्यायाधीश वर्मा यांच्यानंतर आता न्यायाधीश शर्मा यांच्या विरोधात वकील हल्लाबोल करीत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयातून बदली होऊन कलकत्ता न्यायालयात रुजू झालेल्या न्यायाधीश दिनेश कुमार शर्मा यांना वकिलांनी विरोध केला आहे. वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दिनेश कुमार शर्मा काल सकाळी 10 ते 3.30 वाजेपर्यंत न्यायालयीन कामापासून अलिप्त होते.
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिनेश कुमार शर्मा यांनी दिल्लीतून अलहाबाद उच्च न्यायालयात बदली केल्याची शिफारस केली होती. तेव्हापासून वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. वकिलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने शर्मा यांच्या बदलीची नोटीस काढली आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयातील वकिलांनी एकत्र येत दिनेश कुमार शर्मा यांच्या बदलीला विरोध केला आहे. त्यासाठी कलकत्ता हायकोर्ट बार असोसिएशन, लायब्रेरी क्लब और इनकॉर्पोरेटेड लॉ सोसाइटी या तीन संघटनांनी मुख्य न्यायाधीश टीएस शिवज्ञानम यांना पत्र लिहून शर्मा यांच्या शपथ विधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. शर्मा यांच्याकडे खटल्यांची सुनावणी दिली तर आम्ही त्यांच्या कामावरही बहिष्कार टाकणार, अशा इशारा वकिलांच्या संघटनांनी दिला आहे.
शर्मा यांच्या बदलीला विरोध करीत तीन वकिलांच्या संघटनांनी देशाच्या मुख्य न्यायाधीश संजील खन्ना यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्या बदलीवर आक्षेप घेत विरोध केला आहे. एकाच आठवड्यात दिल्ली हायकोर्टाने तीन न्यायाधीशांची बदली केली आहे.
जस्टिस दिनेश कुमार शर्मा
जस्टिस चंद्रधारी सिंह
जस्टिस यशवंत वर्मा
दुसरीकडे दिल्लीतून पुन्हा अलहाबाद उच्च न्यायालयात बदली झालेल्या यशवंत वर्मा यांच्या बदलीला अलहाबादमधील वकील विरोध करीत आहे. वर्मा-शर्मा यांच्या बदलीला विरोध करीत वकिलांच्या संघटनांनी उच्च न्यायालयाचा उपयोग 'कचरापेटी' म्हणून आम्ही करु देणार नाही, अशा शब्दात वकिलांची विरोध केला आहे.
वर्मा यांच्या घरी कोट्यवधीची रक्कम सापडल्याने ते अडचणीत सापडले आहेत. तर दुसरीकड शर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयात असताना त्यांच्या कामाविषय अनेक तक्रारी आल्या आहेत. अनेक वादग्रस्त खटले ते आपल्याकडे ठेवतात, त्यावर निकाल देत नाहीत, असा आरोप त्याच्यावर केला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.