Supreme Court| 
देश

सर्वोच्च न्यायालयातील कामकाज सामान्य माणसाला आजपासून थेट पाहता येणार

Supreme Court Live Streaming| सकाळी साडेदहा वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सुरू होईल.

सरकारनामा ब्युरो

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात आज मोठा दिवस आहे. न्यायालयाच्या कामकाजांच थेट प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर आजपासून न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून थेट प्रक्षेपण सुरू होईल. विशेष बाब म्हणजे, पहिल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासह EWS आरक्षण आणि बार कौन्सिल परीक्षेच्या वैधतेबाबत सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या सुनावण्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग आजपासून सुरु होईल. न्यायालयाच्या तीन वेगवेगळ्या घटनापीठांसमोर या तिनही विषयावरं होणाऱ्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण देशवासियांना याचि देही याचि डोळे पाहता येणार आहे. देशाच्या दृष्टीने हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. त्यातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील संबंधित याचिकांवरही सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी प्रलंबित असून आज पाच न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर महत्वाची सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. यात न्यायमुर्ती चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्तीं एम.आर. शहा, न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी, न्यायमूर्तीं हिमाकोहली आणि न्यायमूर्तीं पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. बंडखोर आमदारांची अपात्रता, राज्य सरकारची वैधता, निवडणूक चिन्ह या सर्व मुद्द्यांवर कधी सुनावणी घ्यायची आणि आयोगापुढील सुनावणीस दिलेली स्थगिती उठवायची की नाही, याबाबत आज घटनापीठाकडून निर्णय अपेक्षित आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाची माहितीही सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, या उद्देशाने 2018 साली सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांच्यासह अनेकांनी याबाबत याचिका दाखल केली होती. मार्च 2018 मध्ये भारताचे अॅटर्नी जनरल के. के वेणुगोपाल यांना पत्र लिहून संबंधित याचिकेवर त्यांचं मत मागवलं होतं. त्यावर वेणुगोपाल यांनीही चाचणी म्हणून घटनापीठांसमोरील कामकाजांच थेट प्रक्षेपण करण्याची शिफारस केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT