CM Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

Jagan Mohan Reddy : जगनमोहन यांना मोठा धक्का; निवडणुकीआधी खासदारांचे राजीनामे सुरूच...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधीच खासदारांच्या राजीनाम्यांनी वाढली डोकेदुखी...

Rajanand More

Andhra Pradesh News : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना धक्के बसू लागले आहेत. त्यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी एका खासदाराने राजीनामा दिल्याने हा आकडा तीनवर पोहोचला आहे. त्यामुळे जगनमोहन यांची डोकेदुखी वाढली आहे.

नरसरावपेट लोकसभा (LokSabha) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लवू श्री कृष्ण देवरायलू (Lavu Shri Krishna Devraylu) यांनी मंगळवारी खासदारकीसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या मतदारसंघातून पक्षाकडून मागासवर्गातील उमेदवार देण्याची चर्चा असल्याच्या कारणास्तव देवरायलू यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यांना गुंटूरमधून लढण्यास सांगितले होते.

पक्षातून कोणत्याही अस्थिरतेला मी जबाबदार नसेल, असे म्हणत देवरायलू यांनी पक्षाला एकप्रकारे इशारा दिला आहे. त्यांनी मागील निवडणुकीत 50 हजारांचे मताधिक्य असल्याचे सांगत मतदारसंघातील सर्व आमदारांनाही तेच पुन्हा निवडणुकीत उतरावेत, अशी अपेक्षा असल्याचा दावा देवरायलू यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, देवरायलू यांच्याआधी बालशौर्य वल्लभनेनी यांनी दहा दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. ते अभिनेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या जन सेना पक्षात सामील होणार आहेत. या पक्षाची माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naydu) यांच्या तेलगू देसम पक्षाशी युती आहे. खासदारकीचा पहिला राजीनामा संजीव कुमार यांनी दिला होता.

आणखीही खासदार रांगेत

खासदार मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी आणि के. रामकृष्ण राजू हेही राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राजीनाम्यांचे हे सत्र पक्षाने नुकत्याच केलेल्या घोषणेनंतर सुरू झाले आहे. पक्षाकडून काही विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तिरुपतीचे खासदार एम. गुरुमूर्ती, विशाखापट्टणमचे खासदार एमव्हीव्ही सत्तनारायण आणि काकिंदाच्या खासदार वंगा गीता यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जगनमोहन (JaganMohan Reddy) यांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पक्षाकडून आधीच दहा जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात वायएसआरचे 23, तर टीडीपीचे तीन खासदार आहेत.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT