Brij Bhushan Singh Sarkarnama
देश

Brij Bhushan Singh : मोठी बातमी! महिला कुस्तीपटूचं प्रकरण ब्रिजभूषण सिंहांना भोवलं; भाजपनं तिकीट कापलं

Lok Sabha Election 2024 : ब्रिजभूषण सिंह हे सहा वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्यावर ऑलिम्पिकवीर महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केलेला आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीगीर रस्त्यावर उतरले होते.

Sunil Balasaheb Dhumal

BJP political News : भाजपचे बडे नेते, खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचा भाजपने लोकसभेतून पत्ता कट केला आहे. लौंगिक छळाप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ब्रिजभूषण यांच्याऐवजी कैसरगंज (उत्तर प्रदेश) या मतदारसंघातून आता भाजपकडून त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने गुरुवारी (ता. 2) जाहीर केलेल्या यादीत कैसरगंज मतदारसंघासह रायबरेलीचीही उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीतून प्रताप सिंग यांचे नाव जाहीर केले आहे. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या आणि भाजपकडून वारंवार पाठराखण केलेल्या ब्रिजभूषण यांना तिकिट नाकारल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

ब्रिजभूषण सिंह Brij Bhushan Singh हे सहा वेळा खासदार राहिले आहेत. त्यांच्यावर ऑलिम्पिकवीर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केलेला आहेत. त्यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीगीर रस्त्यावर उतरले होते. पक्षात त्यांचा मोठा दबदबा असूनही गंभीर आरोपांमुळे ब्रिजभूषण यांच्याऐवजी भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय शोधवा लागला. असे असतानाही राजकारणातील त्यांचे असलेले स्थानाला धक्का लागू नये याची पुरेपूर काळजी भाजपकडून घेतली आहे. यातूनच भाजपने त्यांचा मुलगा करण याला लोकसभेची उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या निर्णयाबाबत भाजपचे BJP श्रेष्ठींनी ब्रिजभूषण सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या त्यांचा मोठा मुलगा प्रतीक हे आमदार आहेत. तर करण सध्या उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे प्रमुख आहेत. दरम्यान, कैसरगंजमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होत आहे. त्याची शुक्रवारी (ता. 3) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ब्रिजभूषण सिंह हे एक दशकाहून अधिक काळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्यावर गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिकसह देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. दिल्लीत त्यांच्याविरोधात मोठे आंदोलनही छेडले होते. हे प्रकरण देशभर गाजले असले तर भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या त्यांच्याविरुद्धचा खटला दिल्ली न्यायालयात सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT