K Surendran rahul gandhi sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींविरोधात भाजपनं तगडा उमेदवार उतरवला मैदानात

Akshay Sabale

भाजपची पाचवी यादी रविवारी ( 25 मार्च ) जाहीर झाली. भाजपनं वायनाडमधून ( Wayanand constituency ) विद्यमान खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्याविरोधात केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि कें. सुरेंद्रन ( K Surendran ) यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या लढतीकडे देशाचं लक्ष राहणार आहे. पण, राहुल गांधी वायनाड की अमेठीतून लढणार हे अद्याप निश्चित झालं नाही.

2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. अमेठीतून गांधींविरोधात स्मृती इराणी यांना भाजपनं तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत राहुल गांधींना 4 लाख 13 मते मिळाली होती, तर स्मृती इराणींना 4 लाख 68 हजारांहून अधिकचं मताधिक्य मिळालं होतं. इराणींनी राहुल गांधींचा 55 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता, तर वायनाडमधून राहुल गांधी विजयी झाले होते. यातच आता 2024 मध्ये वायनाडमधूनही भाजपनं राहुल गांधींविरोधात के. सुरेंद्रन यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

के. सुरेंद्रन केरळमधील दिग्गज नेते मानले जातात. सुरेंद्रन भाजपचे कट्टर समर्थक असून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. भाजपनं 2020 मध्ये सुरेंद्रन यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पथानामथिट्टा मतदारसंघातून के. सुरेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आलेली. पण, सुरेंद्रन यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

2018 मध्ये सबरीमाला प्रकरणी के. सुरेंद्रन यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे एक महिने त्यांना तुरुंगवारीही झाली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 'बसपा'च्या उमेदवाराला नाव मागे घेण्यासाठी धमकवल्याचा आरोपही सुरेंद्रन यांच्यावर करण्यात आला होता.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT