Union Minister Nitin Gadkari Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या दुसऱ्या यादीत तरी गडकरींचा नंबर लागणार का? आज होणार फैसला...

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपसह सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून, त्यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत भाजपने विरोधकांवर मात केली, तर आज 150 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या यादीतही अनेकांचा पत्ता कट होऊ शकतो, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नंबर या यादीत तरी लागणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भाजपच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत आठ राज्यांतील 99 जागांबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यासह आजच 150 जणांची यादी जाहीर केली जाऊ शकते. त्यामध्ये महाराष्ट्रातीलही (Maharashtra) काही जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

पहिल्या यादीत पंतप्रधान मोदींसह अमित शाह (Amit Shah), राजनाथ सिंह, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकाही उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. सोमवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि चंदीगडमधील जागांची चर्चा झाल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) अपेक्षित जागा मिळत नसल्याने नाराजीची चर्चा आहे. भाजपने राज्यात अधिकाधिक जागा लढवण्याचा हट्ट धरला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची कोंडी झाली आहे. पुढील एक-दोन दिवसांत हा तिढा सुटेल, असे नेत्यांकडून सांगितले जात आहे. तरीही दुसऱ्या यादीत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह आणखी काही उमेदवारांची घोषणा होऊ शकते.

पहिल्या यादीत गडकरींचे नाव नसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. कृपाशंकर सिंह यांचे नाव घेत ठाकरेंनी गडकरींचा अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली होती. तसेच त्यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होते. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.   

दरम्यान, संविधान बदलण्याबाबतचे विधान भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत पक्षामध्ये उलटसुलट चर्चा आहेत. त्यामुळे त्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसभा घुसखोरी प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले प्रताप सिम्हा यांच्यासह कर्नाटकातील तीन ते चार खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळू शकणार नाही, अशी चर्चा आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT