Mayawati Sarkarnama
देश

Mayawati News : उत्तर प्रदेशसाठी मायावतींची मोठी घोषणा; जाट अन् मुस्लिम मतांसाठी खेळी

Rajanand More

Uttar Pradesh News : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati News) यांनी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. जाट, दलित, मुस्लिम, ब्राम्हण यांसह विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्रित करत त्या राज्यात ‘भाईचारा’चा संदेश देत आहे. या अनुषंगाने आज त्यांनी प्रामुख्याने जाट आणि मुस्लिम मतांसाठी उत्तर प्रदेशासाठी महत्वाची घोषणा केली आहे. 

मायावती यांनी प्रचारसभेत बोलताना उत्तर प्रदेशचे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. केंद्रात सत्ता आल्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) स्वतंत्र राज्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या भागाता प्रामुख्याने जाट आणि मुस्लिम समाज अधिक आहे. तसेच स्वतंत्र राज्याची मागणीही अनेक वर्षांपासून आहे. त्यावरच मायावतींनी बोट ठेवले आहे.

सर्व जाती-धर्मांतील उमेदवार उभे केल्याचे सांगत मायावती म्हणाल्या, 2013 मध्ये मुझफ्फरनर येथे दंगल झाली. जाट आणि मुस्लिम समाजात असलेला बंधूभाव समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) काळात संपला. राज्यात माझे सरकार असताना एकही दंगल झाली नाही, असे मायावती म्हणाल्या. या मतदारसंघात मायावतींनी दया शंकर प्रपाती या ओबीसी नेत्याला तिकीट दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट, मुस्लिम आणि दलितांविषयी मायावती यांची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. सभेत बोलताना मायावतींनी तसेच संकेतही दिले. स्वतंत्र राज्याची घोषणा केल्याने जाट समाजाचा आम्हाला पाठिंबा कमी असला तरी तो आता वाढेल. दलितांचा पाठिंबा आम्हाला आहे. मुस्लिम समाजही भाजपला (BJP) विरोध करत आमच्या पाठिशी उभा राहील, असे बीएसपी नेत्यांचे म्हणणे आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील आठ लोकसभा मतदारसंघाचे मतदान पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे मायावती यांनी उत्तर प्रदेशाच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करत चर्चेला तोंड फोडले आहे. त्यावर आता भाजपसह इतर राजकीय पक्षांमधून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागेल.

दरम्यान, त्तर प्रदेशात मायावती एकट्या लढत आहेत. त्यांनी कोणत्याही पक्षाशी आघाडी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा फटका इंडिया आघाडीलाच अधिक बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात इंडिया आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जात आहे. मायावतींचा करिष्मा किती चालणार, यावर इंडिया आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT