Mukesh Dalal, Nilesh Kumbhani Sarkarnama
देश

Nilesh Kumbhani News : बिनविरोध विजयाची स्क्रिप्ट आधीच होती तयार? कुंभानी भाजपमध्ये जाण्याची चर्चा

Lok Sabha Election 2024 : भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना कालच विजयी घोषित करण्यात आले आहे. कुंभानी यांचा अर्ज बाद केल्याच्या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

Rajanand More

Gujarat News : गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी (Nilesh Kumbhani News) यांचा उमेदवार अर्ज बाद झाल्यानंतर इतर आठ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतला. पण बिनविरोध विजयाची स्क्रिप्ट आधीच तयार होती, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. कुंभानी हे सध्या बेपत्ता असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे (BJP) उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) यांना काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित करत प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर काही तासांतच कुंभानी हे बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचा दावा काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन करत घोषणाबाजीही केली. (Lok Sabha Election 2024)

कुंभानी यांच्या घराला कुलूप असून, ते लवकरच भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या घराबाहेर आंदोलन कऱणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारला आहे. बिनविरोध विजयाची स्क्रिप्ट आधीच तयार होती, असा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कसा झाला बिनविरोध विजय?

नीलेश कुंभानी (Nilesh Kumbhani) यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरील सूचकांच्या सह्यांवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच तीन सूचकांनीही या सह्या आपल्या नसल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कुंभानी यांना सूचकांसह बोलावले होते. पण सूचक हजर न झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. डमी उमेदवाराचाही अर्ज बाद ठरला, तर उरलेल्या आठ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने दलाल यांचा विजय सुकर झाला.

काँग्रेसची आयोगाकडे धाव

कुंभानी यांचा अर्ज बाद करण्यात आल्याने काँग्रेसने काल निवडणूक आयोगाकडे (Election Commission) धाव घेतली आहे. तीनही सूचकांचे अपहरण झाल्याची भीती असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला. त्याविरोधात काँग्रेसने तक्रार केली आहे. आता आयोग त्यावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.    

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT