Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : पक्ष, नेते असो वा कार्यकर्ते... निवडणूक आयोगाचे ‘हे’ दहा सल्ले विसरू नका

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. देशात सात टप्प्यांत ही निवडणूक होणार असून चार जूनला सत्ता कुणाची येणार, याचा निकाल लागणार आहे. तारखा जाहीर करताना आयोगाने राजकीय पक्ष आणि नेत्यांना आचारसंहितेसह सर्व सुचनांचे पालन करण्याबाबत सक्त ताकीदही दिली आहे. कुणीही लक्ष्मण रेषा ओलांडू नये, असा इशाराही आयोगाने दिला आहे.

आयोगाने दिलेल्या या दहा महत्वाच्या सुचना...

1. द्वेषपूर्ण भाषण नको – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी कुणीही द्वेषपूर्ण भाषण करू नये, असे आवाहन केले आहे. सुप्रीम कोर्टाकडूनही याबाबत यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत. अशी भाषणे करणारे नेते व कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आयोगाने (Election Commission) स्पष्ट केले.

2. मनी पॉवरवर नजर – निवडणूकीत अनेक भागांत अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला जातो. वस्तूंचे वाटप होते. याबाबत आता नागरिकांनाही तक्रारी करता येणार आहेत. अशा गोष्टी आढळून आल्यास त्यावर लगेच कारवाई होईल.

3. खोटी माहिती पसरवू नका – सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून खोटी माहिती पसरवली जाते. ते रोखण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती पसरवणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

4. गुन्हेगारांना तिकीट का? – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक उमेदवार असतात. त्यांना तिकीट का दिले, याची माहिती राजकीय पक्षांना द्यावी लागणार. टीव्ही, वृत्तपत्रांमधून ही माहिती प्रसारित करावी लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

5. स्टार कँपेनरवर नजर – स्टार कँपेनरसाठीही आयोगाने नियमावली बनवली आहे. त्यांनी कुणावरही प्रचार सभांमध्ये वैयक्तिक टीका करू नये, असे स्पष्ट केले आहे. अशा नेत्यांवर आयोगाकडून कडक कारवाई केली जाऊ शकते.

6. लहान मुलांचा वापर टाळावा – प्रचारात लहान मुलांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर, नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. याबाबत सर्व राजकीय पक्षांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

7. खोट्या जाहिराती नको – राजकीय पक्षांनी खोट्या जाहिराती देऊन फसवणूक करू, असे आवाहन आयोगाने केले आहे. अशा जाहिरातींवर आयोगाची करडी नजर राहणार आहे.

8. जाती-धर्मावरील भाषणांवर नजर – प्रचारात जाती-धर्मावर आधारीत भाषणबाजी टाळावी. सर्वांना जोडणारा प्रचार हवा, एकमेकांना तोडणारा नाही, असे आवाहनही आयोगाने केले आहे. याबाबत नियमावली करण्यात आली आहे.

9. बदनामी नको – विरोधी नेते, उमेदवारांची बदनामी करणारी भाषणे किंवा सोशल मीडियात पोस्ट करू नये, अशा सुचना आयोगाने दिल्या आहेत. हे रोखण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

10. पारदर्शकता ठेवा – निवडणूक (Election) प्रक्रियेदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी पारदर्शकता ठेवावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT