Bhimrao Ambedkar Sarkarnama
देश

Bhimrao Ambedkar News : आंबेडकरांचे तिसरे नातूही लोकसभेच्या रिंगणात; थेट गाठले पंजाब...

Rajanand More

Hoshiarpur Lok Sabha Constituency : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन नातू लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि रिब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यापाठोपाठ भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकरांनीही (Bhimrao Ambedkar News) निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच तिन्ही भाऊ एकाचवेळी लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

भिमराव यशवंत आंबेडकर यांनी ग्लोबल रिपब्लिकन पार्टीतून (Global Republican Party) पंजाबमधील (Punjab) होशियारपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. या मतदारसंघात निवडणुकीच्या (Election) अंतिम म्हणजे सातव्या टप्प्यात एक जूनला मतदान होणार आहे. (Latest Political News)

होशियारपूर मतदारसंघात एकूण 16 उमेदवार असून त्यामध्ये आपचे (AAP) राजकुमार चब्बेवाल, भाजपकडून (BJP) अनिता सोम प्रकाश, काँग्रेसच्या (Congress) यामिनी गोमर, शिरोमणी अकाली दलाकडून सोहन सिंह ठंडल, बसपाकडून रणजीत कुमार रिंगणात आहेत. या प्रमुख पक्षांसोबत इतर स्थानिक पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात आहेत. (Bhimrao Ambedkar Latest News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भिमराव आंबेडकर हे भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी होशियारपूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या होत्या. काही दिवसांपुर्वीच त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचीही भेट घेतली होती.

होशियाररूपमधील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे भिमराव आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. होशियारपूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रातून निधी आणला जाईल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी अकोला तर आनंदराज आंबेडकरांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. दोन्ही मतदारसंघातील मतदार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भिमराव यांनी आनंदराज यांच्या प्रचारातही सहभाग घेतला होता. काही प्रचार सभांमधून त्यांनी भाषणेही केली. आनंदराज यांचे निवडणूक चिन्हही गॅस सिलिंडर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT