Salman Khurshid Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : झुकणार नाही! जागावाटप होताच काँग्रेसमधील बड्या नेत्याचे बंडाचे निशाण

Congress Leader Salman Khurshid : सलमान खुर्शिद यांनी 2014 आणि 2019 मध्ये फर्रुखाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती,पण दोन्ही वेळा पराभूत झाले.

Rajanand More

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटवापर काँग्रेस आणि समाजवादी पक्षात दोन दिवसांपूर्वी एकमत झाले. उत्तर प्रदेशातील एकूण 80 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या आहेत, पण आता त्यावरून पक्षामध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आघाडीची घोषणा झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पक्षातून नाराजीचे सूर येऊ लागले चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. सलमान खुर्शिद यांनी 2014 आणि 2019 मध्ये फर्रुखाबाद मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण दोन्ही वेळा पराभूत झाले.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये (Congress) ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार फर्रुखाबाद मतदारसंघ सपाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे खुर्शिद नाराज झाले आहेत. त्यांनी एक्स हँडलवर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, 'फर्रुखाबादशी माझ्या नात्याला किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत? माझा प्रश्न नाही, आमच्या सर्वांच्या भवितव्याचा आहे. येणाऱ्या पिढ्यांचा प्रश्न आहे. नशिबाच्या निर्णयांसमोर कधी झुकलो नाही. झुकणारही नाही.' खुर्शिद यांच्या या बंडाच्या भूमिकेमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, काही दिवसांपासून सपा आणि काँग्रेस या पक्षांमध्ये जागावाटपाचे घोडे अडले होते. त्यामुळे अखिलेश यादव इंडिया आघाडीतून बाहेर पडणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पण दोन दिवसांपूर्वी आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याने इंडिया आघाडीसाठी (India Alliance) पहिली मोठी खूषखबर आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतील पक्षांकडून काँग्रेसला आधीच धक्के देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातही आघाडीत फूट पडणार अशी चर्चा होती, पण अखेर अखिलेश (Akhilesh Yadav) यांनी काँग्रेसला हिरवा कंदील दाखवला आहे. 

काँग्रेसला 17 जागा

काँग्रेसला अमेठी, रायबरेलीसह प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाजियाबाद, कानपूर नगर, झांसी, बाराबंकी, फतेहपूर सिकरी, सहारनपूर आणि मथुरा या जागा मिळाल्या आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT