Jayant Chaudhary, Akhilesh Yadav Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : अखिलेश यांना छोटे चौधरी देणार मोठा धक्का; यूपीत ‘सायकल’ पंक्चर?

Jayant Chaudhary : लोकसभा निवडणुकीत जयंत चौधरी भाजपसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपुर्वीच अखिलेश यांनी चौधरींसोबत आघाडी केल्याचे जाहीर केले होते.

Rajanand More

Uttar Pradesh : इंडिया आघाडीला बिहारनंतर उत्तर प्रदेशातही झटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय लोकदलाकडून समाजवादी पक्षासोबत असलेली आघाडी तोडण्याचे संकेत दिले आहेत. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्याचे काही दिवसांपुर्वीच जाहीर केले आहे. तसेच आरएलडीला लोकसभेच्या सात जागा सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण त्यानंतर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Lok Sabha Election 2024)  

उत्तर प्रदेशातील राजकारणात जयंत चौधरी (Jayant Chaudhary ) यांची साथ कोणत्याही पक्षासाठी महत्वाची मानली जाते. पश्चिम यूपीमध्ये जाट, मस्लिम आणि दलित मतदारांची संख्या अधिक आहे. या भागात लोकसभेच्या 23 जागा आहेत. त्यापैकी 12 जागांवर जाट मतदारांचा दबदबा आहे. हे मतदार आरएलडीला समर्थन देतात. त्यानंतर दलित व मुस्लिम मतदारांचा क्रमांक लागतो. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सपासोबत या भागात भाजपला (BJP) झटका दिला आहे. ते उत्तर प्रदेशात छोटे चौधरी म्हणून प्रसिध्द आहे.

मागील लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून असेलली अखिलेश (Akhilesh Yadav) आणि जयंत यांची ही मैत्री आता संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. अखिलेश यांनी चौधरी यांच्या पक्षाला सात जागा देणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यानंतरही चौधरी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपनेही चौधरी यांना पाच जागांची ऑफर दिली आहे. त्यावर चौधरी गांभीर्याने विचार करण्यात असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अखिलेश यांनी दिलेल्या जागांबाबत काही अटी घातल्याचे समजते. त्यामुळे चौधरी हे एनडीएचा रस्ता धरू शकतात. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात येत आहे. त्याचदिवशी जयंत चौधरी एनडीएसोबत जाण्याची घोषणा करू शकतात. असे झाल्यास अखिलेश यांच्यासह इंडिया आघाडीसाठीही हा मोठा धक्का असेल.

दरम्यान, या चर्चेवर बोलताना अखिलेश यादव म्हणाले, ‘जयंत हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना राजकारण चांगल्याप्रकारे समजते. ते शेतकऱ्यांचा लढा कमजोर होऊ देणार नाहीत, अशी आशा आहे.’ तर खासदार डिंपल यादव यांनी चौधरींना एनडीएसोबत न जाण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT