tejasvi surya Kangana Ranaut sarkarnama
देश

Kangana Ranaut News : तेजस्वी सूर्या मासे खातात, गुंडगिरी करतात; भाजप खासदाराबद्दल कंगना काय बोलून गेली?

Kangana Ranaut On Vikramaditya Singh : हिमाचलमध्येही एक राजपुत्र आहे. त्यांना भारतामध्ये कुणी ओळखत नाही, अशी टीका कंगनानं विक्रमादित्य सिंह यांच्यावर केली आहे.

Akshay Sabale

हिमाचल प्रदेशातील ( Himachal Pradesh ) मंडी या लोकसभा मतदारसंघातून भाजपनं अभिनेत्री कंगना रनौतला उमेदवारी दिली आहे. कंगना रनौत तिच्या विधानांमुळे सतत चर्चेत असते. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यावर निशाणा साधताना भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याबद्दल कंगना रनौत यांनी वक्तव्य केल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तेजस्वी सूर्या मासे खातात, असं रनौत यांनी म्हटलं. तेजस्वी सूर्या हे भाजपचे खासदार असून दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह ( Vikramaditya Singh ) आणि कंगना रनौत ( Kangana Ranaut ) यांच्यात मंडी लोकसभा मतदारसंघात लढत होत आहे. विक्रमादित्य सिंह हे हिमाचलमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे तिथे 'कांटे की टक्कर' होत आहे. शनिवारी ( 4 मे ) मंडीत येणाऱ्या सरकाघाटा विधानसभा क्षेत्रातील जनतेला कंगना रनौतनं संबोधित केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कंगना रनौत म्हणाली, "यांना स्वत:लाच माहित नाही ते कुठं येत आहेत, कुठं जात आहेत. या प्रकारे राजपुत्रांचा एक पक्ष आहे. मग ते राहुल गांधी असो, ज्यांना चंद्रावर बटाट्याचं पीक घ्यायचं आहे. अन्यथा तेजस्वी सूर्या असो, जे गुंडगिरी करतात. मासे दाखवून दाखवून खातात."

"हिमाचलमध्येही एक राजपुत्र आहे. त्यांना भारतामध्ये कुणी ओळखत नाही. त्यांना फक्त हिमाचलमध्ये ओळखतात. या राजपुत्रांनी काही विधान केली आहेत. ते म्हणतात, 'ही महिला ( कंगना ) अपवित्र आहे.' मात्र, मी पद्मश्री पुरस्कार विजेती आहे. तरीही ते मला अपवित्र म्हणतात. मला येथून जाण्यास सांगतात. ही बाब चिंताजनक आणि निंदनीय आहे," अशी टीका कंगना रनौतनं विक्रमादित्य सिंह यांच्यावर केली आहे.

नेमकं काय घडलं?

कंगनाला बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना लक्ष्य करायचं होतं. कारण, काही दिवसांपूर्वीच्या निवडणूक प्रचारावेळी तेजस्वी यादव यांनी मासे खास असतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. चैत्र नवरात्रीच्या आदल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ शेअर केल्यानं विरोधकांकडून यादव यांच्यावर टीका झाली होती. मात्र, बोलण्याच्या ओघात कंगना रनौत चुकली आणि तेजस्वी यादव यांच्या जागी तेस्वी सूर्या यांचं नाव घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT