Nitin Gadkari, Raj Thackeray Sarkarnama
देश

Nitin Gadkari News : शाहांच्या भेटीआधी राज ठाकरेंचा आज सकाळीच गडकरींना फोन

Rajanand More

New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्यामुळे मनसेही महायुतीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण या भेटीआधी राज ठाकरेंनी आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari News) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द गडकरींनीच ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. आज दुपारी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आधी भाजपचे (BJP) नेते विनोद तावडे आणि त्यानंतर अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, भाजप आणि मनसेचे (MNS) राज्यातील नेते मनसेच्या महायुतील समावेशाबाबत संकेत देत आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांचा आज सकाळीच आपल्याला फोन आल्याचा खुलासा केला आहे. त्यांना मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना गडकरी म्हणाले, ‘मला आज सकाळीच राज ठाकरेंचा फोन आला होता. पण त्याचे कारण दुसरे होते. त्यांच्या पासपोर्टचे काम होते, ते झाले. त्यासाठी त्यांनी माझे आभार मानले.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपाबाबत काय चर्चा सुरू आहेत, हे मला माहिती नाही. त्याचा निर्णय पक्ष करेल. पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे अध्यक्ष त्याचा निर्णय घेतील, असेही गडकरी म्हणाले. मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत गडकरी यांनी भाष्य करण्याचे टाळले. याबाबतही पक्ष निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील जागावाटपातील तिढ्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, तिथे सर्वकाही ठीक सुरू

आहे. जोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाहीत, तोपर्यंत चर्चा सुरू असतात.. एक जागेसाठी दहा इच्छुक उमेदवार असतील तर चर्चा होत असते. लवकरच त्यावर निर्णय होईल. आम्ही सर्वजण मिळून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवू, असे गडकरी म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT