Mumtaz Patel, Ahmed Patel Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : अहमद पटेलांच्या मुलीने मागितली कार्यकर्त्यांची माफी; भाजपनं काँग्रेसला डिवचलं...

Rajanand More

New Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीसह गुजरातमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागावाटपामध्ये गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघ आपच्या वाट्याला गेला आहे. दिवंगत नेते अहमद पटेल यांचा हा मतदारसंघ. त्यावरून त्यांची मुलगी मुमताज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्या प्रयत्नशील होत्या. (Lok Sabha Election 2024)

अहमद पटेल हे काँग्रेसचे (Congress) विश्वासू नेते होते. काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. कोरोनामुळे 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांची मुलगी मुमताज पटेल (Mumtaz Patel) सामाजिक कार्यात सक्रीय झाल्या होत्या. पटेलांच्या सर्व सामाजिक संस्था, रुग्णालये व इतर संस्थांच्या कामांसोबत त्यांनी लोकसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली होती.

भरूच मतदारसंघ हा पटेलांचा बालेकिल्ला मानला जातो. पण आता जागावाटपामध्ये हा मतदारसंघ आपच्या वाट्याला गेला आहे. त्यावरून मुमताज यांनी आपल्या एक्स हँडलवर भावनिक पोस्ट करत कार्यकर्त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आघाडीमध्ये भरूच मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यात अपयश आल्याने मी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची माफी मागते. मी तुमची नाराजी मांडली. आता आपण पुन्हा नव्याने काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू. अहमद पटेलांचा (Ahmed Patel) 45 वर्षांचा वारसा आपण व्यर्थ जाऊ देणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुमताज पटेल यांच्या पोस्टवर भाजपने (BJP) काँग्रेसला डिवचलं आहे. भाजपचे नेते अमित मालवीय म्हटले आहे की, भरूचची जागा आपला देऊन राहुल गांधींचा हा अहमद पटेलांचा वारसा मिटवण्याचा प्रयत्न आहे. राहुल गांधी आणि अहमद पटेलांमधील वाद सर्वांनाच माहिती आहेत. वापर करा आणि फेकून द्या, यावरच गांधींचा विश्वास आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्याचा विचार करून पक्षाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. मी भरूचबाबत नाराज होतो. पण कोणताही निर्णय एखाद्या व्यक्तीसाठी घेतला जात नाही तर तो पक्षासाठी असतो, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT