Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : पाटलांच्या माघारीनंतर बाबांच्या उमेदवारीची चर्चा; शरद पवारांचा मात्र वेगळा सूर...

Satara Lok Sabha Election News : "पृथ्वीराज चव्हाणांना साताऱ्यातून उमेदवारी देण्याबाबत विचार होऊ शकतो का?"

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा लोकसभेसाठी उमेदवारीचा निर्णय घेण्यासाठी खासदार शरद पवार यांनी आज साताऱ्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कानोसा घेतला. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतल्याने साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत पवारांनी ही जागा राष्ट्रवादीची असून ती राष्ट्रवादीलाच राहिल, असे सांगून चव्हाणांच्या उमेदवारीचा दावा फेटाळला. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सातारा लोकसभेसाठी उमेदवार ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते स्वत: व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यावर पत्रकारांनी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांना साताऱ्यातून उमेदवारी देण्याबाबत प्रश्न विचारला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पृथ्वीराज चव्हाणांना साताऱ्यातून उमेदवारी देण्याबाबत विचार होऊ शकतो का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ही जागा राष्ट्रवादीचीच असून ती राष्ट्रवादीलाच राहिल, असे सांगून त्यांनी चव्हाणांच्या उमेदवारीचा दावा फेटाळला. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) व बाळासाहेब पाटील यांच्यापैकी उमेदवार कोण असेल, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, माझ्या डावीकडे बाळासाहेब पाटील बसले असून उजव्या बाजूला शशिकांत शिंदे आहेत. त्यांनी आता आमच्या राष्ट्रवादीला मताधिक्य मिळवून द्यावे, असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT