BJP Sarkarnama
देश

Akhilesh Yadav News : जनता के सच्चे सवाल! अखिलेश यांनी भाजपला विचारले 109 प्रश्न...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी होणार आहे. त्याआधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav News) यांनी भाजपला 109 प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न जनतेचे असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघातही मंगळवारी मतदान होणार आहे. त्यामुळे आता यादव यांच्या या प्रश्नांना भाजप कसे उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

अखिलेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 109 प्रश्नांची यादीच टाकली आहे. ‘भाजपा (BJP) की झूठी सरकार, जनता के सच्चे सवाल’, असे शीर्षक या प्रश्नांना देण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकरी आंदोलन (Farmers Protest), कोरोना लस, मणिपूर हिंसा (Manipur Violence), बलात्काराच्या घटना अशा मुद्यांशी संबंधित हे प्रश्न आहेत. (Lok Sabha Election 2024)

भाजपने कोरोना लशीचे (Covid Vaccine) परीक्षण न करता जनतेला लस का दिली, भाजपने कोरोना लस बनवणाऱ्या कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन जनतेचे आयुष्य धोक्यात का टाकले, निकष पूर्ण नसतानाही औषधे आणि इतर उत्पादनांना विक्रीची परवानगी का दिली, असे प्रश्न अखिलेश यांनी उपस्थित केले आहेत. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने शेतकऱ्यांच्या रस्त्यांवर काटे का टाकले, त्यांच्यावर लाठीचार्ज का केला, शेतकऱ्यांना खोटी आश्वासने का दिली, एमएसपीबाबत खोटे का बोलले, शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्यांना साथ का दिली, शेतकऱ्यांचे कर्ज माफ का केले नाही, शेतकऱ्यांच्या खाद्यान्नाच्या पोत्यातून चोरी का केली, असेही शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न अखिलेश यांनी विचारले आहेत. (Latest Marathi News)

मणिपूरमधील हिंसेवरही अखिलेश यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने मणिपूरमधील महिलांच्या अपमानानंतर मौन का बाळगले, तेथील मुख्यमंत्र्यांना कायम का ठेवले, असे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. कर्नाटकात सध्या गाजत असलेल्या प्रज्वल रेवन्ना यांच्या प्रकरणाबाबतही त्यांनी प्रश्न केला आहे महिलांच्या अब्रुचे धिंडवडे काढणाऱ्या कर्नाटकातील आरोपीला सोबत का घेतले, असे सवाल अखिलेश यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT