MP Ritesh Pandey, Mayawati Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : संसदेत मोदींसोबत जेवण केलेल्या खासदाराचा राजीनामा; मायावतींना धक्का

Ritesh Pandey News : खासदार रितेश पांडे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Rajanand More

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीआधी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना मोठा धक्का बसला आहे. आंबेडकरनगर मतदारसंघाचे खासदार रितेश पांडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान पांडे यांनी संसदेच्या कँटीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेवण केले होते. त्यामुळे ते आता भाजपमध्ये दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)

रितेश पांडे यांनी आज मायावतींना (Mayawati) पत्र लिहून राजीनामा दिला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला दहा जागांवर विजय मिळाला होता. त्यापैकी दानिश अली (Danish Ali) यांना बसपाने काही दिवसांपुर्वीच पक्षातून निलंबित केले आहे. आता रितेश पांडे (Ritesh Pandey) यांनी राजीनामा दिला असून आणखी काही आमदार मायावतींना धक्का देऊ शकतात, अशी चर्चा आहे. 

पांडे यांनी पत्रात म्हटलं आहे की, मागील अनेक दिवसांत मला पक्षाच्या बैठकांमध्ये बोलावले गेले नाही. नेतृत्वाकडूनही संवाद साधण्यात आला नाही. भेटीसाठी मी अनेकदा प्रयत्न करून संपर्क होऊ शकला नाही. या काळात मी मतदारसंघातील जनतेच्या कामांसाठी सतत प्रयत्नशील राहिलो. माझी पक्षाला गरज नसल्याच्या निष्कर्षापर्यंत मी पोहचलो आहे. त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रितेश पांडे हे 2019 च्या निवडणुकीत आंबेडकर नगर मतदारसंघातून 95 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे बसपाला (BSP) मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पुढील काही दिवसांत आणखी काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींनी कोणत्याही पक्षासोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याने खासदार नाराज असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाल्याने बसपाच्या खासदारांचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. भाजपनंही ही आघाडी गांभीर्याने घेतल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेशातील अधिकाधिक जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून बसपासह इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT