PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi News : देशातील गरिबी कधी हटणार? पंतप्रधान मोदींनीच सांगितलं...

Rajanand More

Uttar Pradesh News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi News) यांनी रविवारी उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला. मेरठमध्ये झालेल्या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राम मंदिर, कलम 370, भ्रष्टाचार अशा विविध मुद्यांवरून विरोधकांना घेरले. तसेच केंद्र सरकारने केलेल्या कामांचे कौतुक करत मतदारांना भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत जगातील तिसरी मोटी अर्थव्यवस्था बनल्यानंतर गरिबी दूर होईल. आता भारताची वेळ आली आहे. ही निवडणूक विकसित भारत (India) बनविण्यासाठी आहे. कोण खासदार बनणार, कोण निवडून येणार, यासाठी ही निवडणूक नाही.

मोदी म्हणाले, भारत जेव्हा जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, त्यावेळी गरिबी वाढत चालली होती. भारत पाचव्या क्रमांकावर आल्यानंतर 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. मी तुम्हा गॅरंटी देतो की, आपण जेव्हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू तेव्हा गरिबी संपून जाईल आणि एक नवा मध्यम वर्ग भारताच्या विकासाला हातभार लावेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले, देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी मी खूप मोठी लढाई लढत आहे. त्यामुळे मोठंमोठे भ्रष्टाचारी आज गजाआड आहेत. सुप्रीम कोर्टातही (Supreme Court) त्यांना जामीन मिळत नाही. मोदीवर कितीही हल्ले केले तर आता थांबणार नाही. कितीही मोठे असले तरी कारवाई होणार आहे. देशाला लुटणाऱ्यांना ते परत करावेच लागेल, ही मोदी गॅरंटी आहे.

पाच वर्षांचा रोडमॅप

आमचे सरकार तिसऱ्या कार्यकाळाच्या तयारीला लागले आहे, असा सांगत मोदींनी पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार करण्याचे स्पष्ट केले. नवीन सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांत कोणते मोठे निर्णय घेता येतील, यावर वेगात काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT