West Bengal Voting Live Sarkarnama
देश

West Bengal Voting Live: धक्कादायक: शेवटच्या टप्प्यातील मतदानाला गालबोट, EVM तलावात फेकले!

Mangesh Mahale

Violence During Final Phase Voting In Bengal: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान (West Bengal Voting Live) पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारात आयएसएफ, माकपचे अनेक समर्थक जखमी झाले आहेत.

सातव्या टप्प्यातील मतदान सुरू होताच पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगण्यातील कुलताई येथील बूथ क्रमांक ४०, ४१ वर एका जमावाने हल्ला केला. मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन जवळच्या तलावात (EVM Tossed Into Pond) फेकून दिले.

मतदान केंद्रावर तणावपूर्ण शांतता आहे. हा हल्ला तृणमूल समर्थकांनी केल्याचा आरोप होत आहे. हल्ल्यात देशी बॉम्बचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलारहाट पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पश्चिम बंगालमधून पहिल्या टप्प्यापासून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहे. अलीपुरद्वार तुफानगंज-2 ब्लॉकमधील बारोकोली-1 ग्रामपंचायतच्या हरिरहाट भागातील टीएमसीच्या तात्पुरत्या पक्ष कार्यालयाला भाजप समर्थकांनी आग लावल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांसाठी आज मतदान होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील 13 पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, ओडिशाच्या 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3 आणि चंदीगडमधील एका जागेसाठी मतदान सुरु आहे.

देशातील बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. हमीरपूरमधून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, डायमंड हार्बरमधून ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी,पाटलीपुत्रमधून लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती, मंडी मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत निवडणुकीच्या रिंगणात आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT