Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : 'भाजपचे खासदार उन्मेश पाटील दणका देणार?' महाजन म्हणतात, 'याची फक्त चर्चाच...'

Jalgaon Political News : मुंबई येथे आज दोघांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांची चर्चा सुरू आहे.

Chetan Zadpe

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करन पवार पक्ष सोडून ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. मात्र, याबाबत जिल्ह्याचे नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "याबाबत आपल्याला केवळ सोशल मीडियावर व माध्यमाकडून माहिती मिळाली आहे, प्रत्यक्षात दोघांशी आपला संपर्क झालेला नाही." त्यामुळे उन्मेश पाटील आता नेमके कुणाकडे जाणार याबाबत चर्चांना उधाण येत आहे. (Girish Mahajan On Unmesh Patil Candidacy)

भारतीय जनता पक्षाची जळगाव लोकसभेची उमेदवारी नाकारलेले खासदार उन्मेश पाटील व पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करन पवार हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करीत आहेत, अशी माहिती आहे. उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने जळगाव लोकसभेत काही अंशी त्यांच्या समर्थकांमध्ये खदखद निर्माण झाली, त्यानंतर दोघांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई येथे आज दोघांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्या समवेत जळगाव येथील शिवसेनेचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजनसह काही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईत सुरू असलेल्या या घडामोडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही जोरदार खळबळ उडाली असून, भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव व रावेर लोकसभेत भाजप उमेदवारांवर त्यांचा परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी ‘सरकारनामा‘ने संपर्क साधला.

या वेळी गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, "जिल्ह्यातील मुंबईत सुरू असलेल्या घडामोडीची माहिती आपल्या प्रसिद्धी माध्यम व सोशल मीडियावरून मिळाली आहे, परंतु खासदार उन्मेश पाटील व करन पवार यांनी आपल्याशी कोणताही प्रत्यक्ष संपर्क साधलेला नाही. गेल्या चार पाच दिवसांपासून आपण मुंबईतच आहोत, परंतु त्यांनी आपल्याशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे ते भाजप सोडणार असल्याबाबत कोणतीही चर्चा नाही. याची मला माहितीही नाही. त्यांनी संपर्क केल्यास आपण त्यांच्याशी निश्‍तित चर्चा करणार आहोत.

(Edited By Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT