PM Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Election News : मोदींना मत हेच माझ्यासाठी लग्नाचे गिफ्ट; पठ्ठ्यानं लग्नपत्रिकेतून केला प्रचार

Rajanand More

Telangana News : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election News) रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. उमेदवार अन् कार्यकर्त्यांकडूनही प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. अशीच एक लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. अनेक लग्नपत्रिकांमध्ये ‘लग्नाला येताना भेटवस्तू आणू नयेत,’ असे लिहिले जाते. या पत्रिकेत मात्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत हेच आपल्यासाठी गिफ्ट असल्याचे लिहिण्यात आले आहे.

तेलंगणातील (Telangana) नंदीकांती नरसिम्लू यांचा मुलगा साई कुमारचा विवाह चार एप्रिलला आहे. त्यासाठी त्यांनी छापलेल्या लग्नपत्रिकेतूनच प्रचार करण्यात आला आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना त्यांनी मोदींना (PM Narendra Modi) मत देण्याचे आवाहन केले आहे. त्यावर मोदींचा फोटोही छापण्यात आला आहे. त्यामुळे ही पत्रिका व्हायरल झाली आहे. 

या पत्रिकेविषयी नरसिम्लू म्हणाले, माझ्या कुटुंबाला ही कल्पना सुचली. पंतप्रधान मोदींविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी असे केल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अशीच लग्नपत्रिका व्हायरल झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या निवडणुकीवेळी मोदींच्या चाहत्याने लग्नपत्रिकेच्या माध्यमातून मोदींना मत देण्याचे आवाहन केले होते. उत्तराखंडमध्येही असाच प्रकार घडला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) संबंधित व्यक्तीला नोटीसही बजावण्यात आली होती. आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणास्तव ही नोटीस देण्यात आली होती. त्यावरून बरीच चर्चाही झाली होती.

दरम्यान, तेलंगणामध्ये सध्या काँग्रेसची (Congress) सत्ता आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव करत काँग्रेसने पहिल्यांदाच सत्ता काबीज केली. या निवडणुकीत भाजपलाही फारसे यश मिळाले नाही. आता लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, विविध ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असे चित्र आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेकडील इतर राज्यांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याचे पोलमधून दिसून आले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT