Lok Sabha election 73 Women Candidates Win Sarkarnama
देश

Lok Sabha election 73 Women Candidates Win: 73 महिला सांभाळणार लोकसभेचा कारभार; महाराष्ट्राच्या 7 खासदारही लावणार हातभार!

Mangesh Mahale

Lok Sabha 73 Women Candidates Win: महिलांसाठी राखीव जागा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरची लोकसभेची ही पहिलीच निवडणूक झाली. विधेयकाची अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे. पण या निवडणुकीत अनेक महिला खासदारांनी विजय मिळवला आहे. नव्या लोकसभेत 73 महिला खासदार असणार आहेत. यात महाराष्ट्रातील 7 महिला खासदारांचा समावेश आहे.

सर्वाधिक ११ महिला पश्चिम बंगालमधून निवडून आल्या आहेत. यामुळे १८ व्या लोकसभेतील महिलांच्या प्रमाणाची टक्केवारी १३.४४ झाली आहे. सर्वाधिक ६९ महिलांना भाजपने संधी दिली होती, त्याखालोखाल ४१ महिलांना काँग्रेसने संधी दिली होती. भाजपच्या ३०, काँग्रेसच्या १४, तृणमूलच्या ११, समाजवादी पक्षाच्या चार, द्रमुकच्या तीन आणि संयुक्त जनता दल आणि एलजेपी (आर) च्या प्रत्येकी दोन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

१७ व्या लोकसभेत ७८ महिला सदस्य होत्या. त्याच्या एकूण जागांच्या प्रमाणातील टक्केवारी १४ होती. १६व्या लोकसभेत ६४, तर १५ व्या लोकसभेत ५२ महिला सदस्य होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभेत प्रत्येकी २४ महिला खासदार होत्या. २०१९ च्या निवडणुकीत ७८ महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत ७९७ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या.

महाराष्ट्रातील महिला खासदार

सोलापूर:प्रणिती शिंदे: काँग्रेस:प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 मते पडली होती. सातपुते यांना 5 लाख 46 हजार 28 मते पडली आहेत. 74 हजार 197 मतांनी प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांचा पराभव केला.

बारामती : सुप्रिया सुळे: शरद पवार गट: सुप्रिया सुळे यांना 7 लाख 32 हजार 312 मतं पडली आहेत. सुनेत्रा पवार यांना 5 लाख 73 हजार 979 मते मिळाली होती. 1 लाख 58 हजार 333 मतांनी सुळे निवडून आल्या आहेत.

धुळे:शोभा बच्छाव: काँग्रेस: सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभव केला. बच्छाव यांना 5 लाख 83 हजार 866 मतं पडली होती. तर सुभाष भामरे यांना 5 लाख 80 हजार 35 मतं पडली होती. बच्छाव यांनी 3831 मतांनी भामरे यांचा पराभव केला.

चंद्रपूर: प्रतिभा धानोरकर: काँग्रेस भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 मतं पडली होती. धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी मुनगंटीवारांचा पराभव केला.

जळगाव:स्मिता वाघ: भाजप: स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांचा पाडाव केला. वाघ यांना 6 लाख 74 हजार 428 मतं मिळाली. करण पाटील यांना 4 लाख 22 हजार 834 मते मिळाली. 2 लाख 51 हजार 594 मतांनी त्या विजयी ठरल्या.

रावेर:रक्षा खडसे: भाजप: रक्षा खडसे यांना 6 लाख 30 हजार 879 मते पडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3 लाख 58 हजार 696 मते मिळाली. खडसे यांनी 2 लाख 72 हजार 183 मतांनी विजय मिळवला.

उत्तर-मध्य मुंबई: वर्षा गायकवाड: काँग्रेस वर्षा गायकवाड यांनी सरकारी वकील आणि भाजप उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला. गायकवाड यांना 4 लाख 45 हजार 545 मते मिळाली. निकम यांना 4 लाख 29 हजार 31 मते मिळाली. गायकवाड यांनी 16 हजार 514 मतांनी निकम यांचा पराभव केला.

प्रिया सरोज: सर्वांत तरुण खासदार

समाजवादी पक्षाच्या प्रिया सरोज (वय २५) आणि करानातून निवडून आलेल्या इकरा चौधरी (वय २९) या सर्वात तरुण खासदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT