लोकसभेमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन महत्वाची विधेयके सादर केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना 30 दिवस तुरुंगात राहिल्यास पदावरून हटविण्याची तरतुद त्यात करण्यात आली आहे. या विधेयकांना विरोधकांनी जोरदार विरोध केला. पण यादरम्यान काँग्रेस नेत्याने केलेले एक विधान शहांच्या जिव्हारी लागले. त्यांनी सोशल मीडियातून त्यावर जोरदार प्रहार केला आहे.
अमित शाह हे गुजरातचे गृहमंत्री असताना अटक झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला नव्हता, असे विधान काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केले होते. त्याला शहांनी लोकसभेत लगेच उत्तर दिले होते. पण हे विधान त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागल्याने त्यांनी एक्सवरही लांबलचक पोस्ट करत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे.
अमित शहांनी म्हटले आहे की, मी काँग्रेसला आठवण करून देऊ इच्छितो की, अटक होण्याआधीच मी राजीनामा दिला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतरही कोर्टात निर्दोषत्व सिध्द होईपर्यंत मी कोणतेही संविधानिक पद घेतले नव्हते. राजकीय सूडाने प्रेरित म्हणत कोर्टाने माझ्याविरोधातील केस फेटाळली होती.
भाजप आणि एनडीए नेहमीच नैतिक मुल्यांच्या बाजूने उभे राहिले आहे. लाल कृष्ण अडवाणी यांनी केवळ आरोप होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दुसरीकडे इंदिरा गांधींनी सुरू केलेली अनैतिक परंपरा काँग्रेस पक्ष आजही पुढे चालवत आहे. लालू प्रसाद यादव यांना वाचविण्यासाठी काँग्रेसने आणलेल्या अध्यादेशाला राहुल गांधींनी विरोध केला आणि आता तेच राहुल गांधी पटनातील गांधी मैदानात लालूंची गळाभेट घेत आहेत. विरोधकांचे हे दुहेरी चरित्र लोकांना आता कळेल आहे, अशी टीका शहांनी केली.
विधेयक संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठविले जाणार आहे. तिथे त्यावर विस्तृतपणे चर्चा होईल, हे आधीपासून स्पष्ट होते. पण तरीही सगळी लाजलज्जा सोडून भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडी आघाडी एकत्रितपणे अनुचित पध्दतीने विधेयकाचा विरोध करत होती. आज विरोधक जनतेसमोर एक्सप्रोज झाले आहेत, असा निशाणाही अमित शहांनी साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.