Anant Ambani Marriage row in Parliament Sarkarnama
देश

Lok Sabha Session : अनंत अंबानींच्या विवाहावरून संसदेत हंगामा; सत्ताधारी-विरोधक आमनेसामने...

Anant Ambani Marriage Congress BJP : काही दिवसांपूर्वी मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा पार पडला.

Rajanand More

New Delhi : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विवाहावरून मंगळवारी लोकसभेत हंगामा झाला. काँग्रेसने भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांना चांगलेच धारेवर धरले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी अनंत अंबानीच्या विवाहसोहळ्यात उपस्थित होत्या, असा दावा दुबे यांनी नुकताच केला होता.

अर्थसंकल्पावर बोलताना दुबे यांनी प्रियांका गांधी यांच्याविषयी केलेल्या दाव्यावरून काँग्रेसचे नेते मंगळवारी भडकले. दुबे यांनी माफी मागण्याची मागणी नेत्यांनी केली. ते सभागृहात वारंवार खोटी माहिती देत असल्याचेही नेते म्हणाले.

नेमकं काय घडलं?

फायनान्स बिलावरील खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण संपल्यानंतर निशीकांत दुबे बोलण्यासाठी उठले. सुप्रिया सुळे यांनी केवळ विरोधकांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची कारवाई होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. दुबे यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न करताना भाजपच्या खासदारांवर कारवाई होत असल्याचे सांगतिले.

दुबे मध्येच बोलण्यासाठी उठल्याचे पाहून काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल भडकले. त्यांनी अनंत अंबानी यांच्या विवाहाचा मुद्दा काढला. दुबे सभागृहात खोटे बोलता. त्यांना असे करण्याची परवानगीही मिळते. अंबानीच्या विवाह सोहळ्यात प्रियांका गांधी सहभागी झाल्या नव्हत्या, असे वेणुगोपाल म्हणाले. त्यावर सत्ताधारी बाकांवरून त्या विवाहसोहळ्यात सहभागी झाल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान, दुबे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत प्रियांका गांधी यांच्याविषयी केलेल्या दाव्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनीही स्पष्टीकरण दिले होते. त्या विवाहात सहभागी झाल्या नव्हत्या. त्यावेळी त्या परदेशात होत्या, अशी माहिती शुक्ला यांनी दिली होती. प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही दुबे खोटे बोलत असल्याचे सांगत माफी मागण्याची मागणी केली होती.

लोकसभेत मंगळवारी सुप्रिया सुळे यांनी प्रियांका गांधीच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ज्या विवाहात पंतप्रधान जाऊ शकतात, तिथे इतर कुणी जाणे चुकीचे आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच विरोधकांविषयी असे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे भाजपचे काम असल्याची टीकाही त्यांनी केली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT