New Delhi : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले असले तरी हा विषय बुधवारी थेट लोकसभेत पोहचला. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केले.
लोकसभेत बोलताना खासदार शिंदे यांनी सरकार महाराष्ट्रात तणाव वाढवत असल्याची टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या संविधानाअंतर्गत मागासवर्गाला आरक्षण मिळाले. पण मागील काही वर्षांपासून सरकार अनेक कंपन्यांचे खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहे. तिथे जरांगे उपोषणाला बसले आहेत, असे शिंदे यांनी सभागृहाला सांगितले. या अधिवेशनात पहिल्यांदाच जरांगे यांचा आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, धनगर बंधू एसटीमध्ये येण्याची मागणी करत आहेत. पण सरकार तणाव वाढवत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मग त्यानंतरही चर्चा करून मराठा व धनगर आरक्षणावर मार्ग का काढला जात नाही. एवढा वेळ का लावला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मराठा आणि धनगर आरक्षणावर मार्ग काढावा, अशी विनंती शिंदे यांनी केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर केले असले तरी जातनिहाय जनगणना होईपर्यंत त्याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे ही जनगणना लवकरात लवकर करावी, अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.