Lok Sabha Speaker Om Birla
Lok Sabha Speaker Om Birla Sarkarnama
देश

Lok Sabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड

Rajanand More

New Delhi : लोकसभा अध्यक्षपदी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली आहे. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी बिर्ला यांची निवड झाल्याचे घोषित केले.

18 व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या आसनापर्यंत नेले. बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएतील अनेक सदस्यांनी अनुमोदन दिले.

इंडिया आघाडी च्यावतीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या नावाला सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीतील काही सदस्यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर महताब यांनी आवाजी मतदान घेत बिर्ला यांची निवड झाल्याचे जाहीर केले. एनडीएच्या तुलनेत आघाडीचे संख्याबळ कमी असल्याने बिर्ला यांची निवड निश्चित होते. त्यानुसार बिर्ला हे नवे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT