BJP Congress : Loksabha Election
BJP Congress : Loksabha Election  Sarkarnama
देश

Loksabha Election : "2024 च्या लोकसभेत भाजपचा पराभव होणार!"

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election : २०२४ च्या एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुका होण्याचे कयास आहेत. देशात अजूनही भाजपचीच जादू कायम आहे, असे अनेक भाजप नेते आजही तावातावाने सांगताना दिसून येतात. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात राम मंदिराचं लोकार्पण होणार, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी नुकतीच केली होती. या अशा राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे नेते व खासदार शशी थरूर यांनी एक भविष्यवाणी केली आहे. '२०२४ ला भाजपचा पराभव होऊ शकतो,' असे थरूर म्हणाले.

नेमकं काय़ म्हंटलंय शशी थरूरांनी ?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला २०१९ सारखे यश मिळणार नाही. २०२४ ला भाजपाला जवळपास ५० जागा गमवाव्या लागू शकतात. ५० जागांवर पराभव झाल्यानंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही. भाजपाने यापूर्वीच काही राज्यांमध्ये आपली सत्ता गमावलेली आहे. यामुळेच यानंतर २०२४ च्या लोकसभेत भाजपला बहुमत गाठणे कठीण असणार आहे. कदाचित भाजपला २०२४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.१३ जाने) पार पडलेल्या केरळ साहित्य संमेलनाच्या मंचावर थरूर यांनी ही भविष्यवाणी केली आहे.

२०१९ सारखी कामगिरी भाजपाला राखता येणार नाही :

शशी थरूर पुढे म्हणाले, २०१९ लोकसभेला भाजपाने खूपच उत्तम कामगिरी दाखवली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात अशा राज्यातही भाजपाचा वेगळा चमत्कार दिसून आला होता. पश्चिम बंगाल राज्यात भाजपाने तब्बल १८ जागा पटकावल्या होत्या. मात्र २०१९ ची परिस्थिती २०२४ च्या निवडणुकांमध्ये असणार नाही. यामध्ये भाजपचा पराभव होईल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच पुलवामा सारखा सैनिकांबाबत प्रकरण घडलं. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनकडूनसर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानवर कारवाई केली. यामुळे भाजप पक्षाला तरूण तरूणींची मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ५४३ जागांपैकी तब्बल ३०३ जागांवर भाजप विजयी झाला. तर काँग्रेसला फक्त ५२ जागांवरच समाधान मानावं लागले.

मात्र अशी स्थिती पुन्हा असणार नाही. देशाच्या लोकशाहीसमोर घराणेशाही हे एक मोठे आव्हान आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा सारखा आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या घराच्या आत पाहावं, त्यानंतरच दुसऱ्यांवर टीका करावी. सगळ्याच पक्षांमध्ये थोड्या जास्त प्रमाणात घराणेशाही आहे, असंही शशी थरूर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT