loksabha elections opposition unity news
loksabha elections opposition unity news sarkarnama
देश

Telangana News : विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात ; काँग्रेस वगळून तिसऱ्या मोर्चासाठी..

सरकारनामा ब्युरो

Telangana News : तेलगंना येथे आज (बुधवारी) होणारी जाहीर सभेकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे. या सभेला विविध विरोधी पक्षाचे नेते हजेरी लावणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेचे राजकीय महत्व अधोरेखीत होणार आहे.

विरोधकांची मोठी सभा आज खम्मम शहरात होत आहे. या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (भाकपा) डी राजा उपस्थित राहणार आहेत.

उत्तर प्रदेशातील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांनी अखिलेश यादव यांना आमंत्रण दिले होते. मात्र, अखिलेश यादव यांनी काँग्रेसला पत्र लिहून अलिप्त राहणे पसंत केले.

त्यानंतर अखिलेश यादव आज तेलंगनात होत असलेल्या सभेला उपस्थित राहणार आहेत. यावरून विरोधीपक्षातील अनेक नेते कॉंग्रेसपासून दोन हात दूर राहताना पाहायला मिळत आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीने 'बीआरएस' असं नाव बदलल्यानंतर ही पहिलीच बैठक होत आहे. तेलंगनातील सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख केसीआर यांनी पुढाकार घेतला आहे.

केसीआर यांना देशात आपलं संघटन मजबूत करून त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष करायचं आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT