LPG Supply Stability and New Booking Rules Sarkarnama
देश

LPG Gas News: महत्वाची बातमी: देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

LPG Supply Stability and New Booking Rules: पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचा फटका थेट सामान्य घरगुती ग्राहकांना बसणार आहे. गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे.

Mangesh Mahale

अमेरिका-इस्त्रायल-इराण युद्धामुळे जगभरात कच्चा तेल्याचे भाव वाढले आहे. एलपीजी सिलिंडरचे दर तीन दिवसापासून वाढवण्यात आले आहे. पेट्रोल, गॅस यांचा तुटवडा होऊ नये म्हणून केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचा फटका थेट सामान्य घरगुती ग्राहकांना बसणार आहे. गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे, हे जाणून घेऊया

देशभरात ESMA लागू

घरगुती गॅसचे वितरण सध्या सुरळीत सुरु आहे. पण व्यावसायिक गॅसबाबत काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचे आढळले आहे. त्यासाठी सरकारे याबाबत कठोर पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू अधिनियमन कायदा (एस्मा) ESMA लागू केला आहे.

गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.तीन दिवसांपूर्वीच पेट्रोलियम मंत्रालयाने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवस केला होता. आता तो वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवणे नव्या नियमानुसार गरजचे आहे.

LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ

  • गेल्या एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. हे नवीन दर 7 मार्चपासून लागू झाले आहेत.

  • दोन दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती, कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत 114.5 रुपयांची वाढ झाली आहे.

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार राजधानी दिल्लीत आता 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे, जो यापूर्वी 853 रुपयांना मिळत होता.

  • मुंबईमध्ये नॉन-सब्सिडी एलपीजीची किंमत 912.50 रुपये झाली आहे.

  • कोलकातामध्ये ही किंमत 939 रुपये झाली आहे.

  • चेन्नईत 14 किलोंच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत.

  • कमर्शियल एलपीजीच्या 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • आता या सिलेंडरची किंमत 1,883 रुपये झाली आहे.

या संस्थांनाही प्राधान्य

आयात केलेल्या एलपीजीमधून घरगुती वापराचे क्षेत्र वगळता रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या इतर क्षेत्रांना प्राधान्य दिले जात आहे.

उद्योगांवर संकट – तातडीने पुरवठा वाढवावा : राजेश अग्रवाल

देशभरात कमर्शियल LPG व औद्योगिक गॅसचा तुटवडा निर्माण होत असून त्याचा मोठा फटका विविध उद्योग, हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय, फूड प्रोसेसिंग उद्योग, तसेच लघु व मध्यम उद्योगांना बसत आहे.अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन (AMCCIE) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक उद्योगांचे उत्पादन प्रभावित होत असून काही उद्योगांवर कामकाज बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर अनेक उद्योगांना उत्पादन कमी करावे लागेल किंवा तात्पुरते बंद करावे लागेल. त्यामुळे लाखो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

AMCCIE च्या सरकारकडे मागण्या

  • उद्योगांसाठी कमर्शियल LPG व औद्योगिक गॅसचा पुरवठा तातडीने वाढवावा.

  • घरगुती व औद्योगिक क्षेत्रासाठी समतोल वितरण व्यवस्था सुनिश्चित करावी.

  • पुरवठा सुरळीत राहण्यासाठी पर्यायी आयात स्रोत व आपत्कालीन उपाययोजना कराव्यात.

  • बाजारातील काळाबाजार व कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी कडक कारवाई करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT