MP Assembly Election: Sarkarnama
देश

MP Assembly Election: निवडणूक लढवण्यासाठी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा; पण काँग्रेसने उमेदवारी नाकारली...

Madhya Pradesh Congress : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निशा बांगरे यांचा निवडणूक लढवण्याचा सस्पेन्स संपवला आहे.

अनुराधा धावडे

MP Assembly Election : राजकारणात नशीब आजमावण्यासाठी अलीकडे अनेक तरुण-तरुणींमध्ये चढाओढ सुरू असते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. त्यात काहींना यश येते तर काहींना नाही. आता असाच एक किस्सा समोर आला आहे.

राजकारणात नशीब आजमावण्यासाठी मध्य प्रदेशातील निशा बांगरे यांनी छत्तरपूरच्या उपजिल्हाधिकारीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसकडून उमेदवारीही मागितली, पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हा सस्पेन्स संपला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निशा बांगरे यांचा निवडणूक लढवण्याचा सस्पेन्स संपवला आहे. निशा बांगरे यांनीही निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. निशा बांगरे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांना आमला मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल त्यांचे मत जाणून घेण्यासाठी निशा बांगरे थेट कमलनाथ यांच्या घरी पोहोचल्या. यानंतर छिंदवाडा येथील जाहीर सभेत कमलनाथ त्यांना काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देणार असल्याचे सांगितले.

मात्र, या वेळी निशा बांगरे निवडणूक लढवणार नसल्याचेही कमलनाथ यांनी स्पष्ट केले.कमलनाथ निशा बांगरे यांना उद्देशून म्हणाले,' तुम्ही निवडणूक लढवत नाही आहात, पण मला तुमच्या सेवेची राज्यात गरज आहे. ज्या महिलांवर अत्याचार झाला, त्या महिलांनाही परत आणण्याची जबाबदारी निशा बांगरेंची असेल. भविष्यात तुम्ही एक सर्वात मोठे उदाहरण व्हाल.

दरम्यान, निशा बांगरे यांनी छत्तरपूरच्या उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला नाही, तेव्हा काँग्रेस पक्षाने आमला येथील उमेदवार म्हणून बांगरे यांचे नाव जाहीर केले. निशा बांगरे यांना आमला या जागेवरून निवडणूक लढवायची होती. काँग्रेस पक्षाने शेवटच्या यादीपर्यंत या जागेवरील उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते. मात्र, या जागेवर काँग्रेसने उमेदवार उभा करताच दुसऱ्याच दिवशी सरकारने निशा बांगरे यांचा राजीनामा स्वीकारला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT