AAP, BJP and Congress Sarkarnama
देश

MP News : भाजप, काँग्रेसमधील बंडखोरांच्या शोधात AAP ; तीन महिन्यापूर्वीच तिकीट..'

'AAP' in search of BJP-Congress rebels : पुढील महिन्यात नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

'AAP' in search of BJP-Congress rebels : मध्यप्रदेशात या वर्षी विधानसभा (madhya pradesh Assembly Elections) निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी त्यासाठी सदस्य नोंदणीसाठी मोहिम उघडली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक मध्यप्रदेशसाठी विशेष आहे, कारण सत्ताधारी पक्षासमोर लढतीसाठी काँग्रेस नसून आम आदमी पार्टी आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास 'आप' फार उत्सुक आहे. 'आप'ला जेवढा आपल्या प्रामाणिक नेत्यांवर विश्वास आहे, तेवढीच त्यांची नजर ही भाजप आणि काँग्रेसमधील संभाव्य बंडखोर नेत्यांवर आहे. निवडणुकीच्या तीन महिन्याआधीच आप उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे मध्यप्रदेशातील 'आप'च्या नेत्यांना सांगितले आहे.

सर्व २३० जागांवर 'आप' आपले उमेदवार उतरविणार आहेत. त्यामुळे 'आप'कडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांना 'आप'ने थेट खुले आवाहन केले आहे.

मध्यप्रदेश विधानसभा ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. 'आप'ने जुनी कार्यकारणी रद्द केली आहे. पुढील महिन्यात नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहेत. पण त्याआधी त्यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

'आप'चे माजी प्रदेश संघटनमंत्री मुकेश जायसवाल म्हणाले, "विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिने अगोदरच २३० जागांवर आप आपले उमेदवार जाहीर करणार आहेत.

याही वेळी आपने ट्रिपल सी फॉर्मूला राबविला आहे. ट्रिपल सी म्हणजे क्रिमनल, कैरेक्टर लैस आणि करप्ट फेस यापासून दूर राहणारे, चांगली प्रतिमा असलेल्या उमेदवारांच्या शोधात 'आप'आहे.

काँग्रेस आणि भाजपमधील बंडखोरांचा शोध 'आप' घेत असल्याची चर्चा आहे. नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर 'आप'ने मध्यप्रदेशात तळागाळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. "दुसऱ्या पक्षात तिकीट कापण्यापूर्वी 'आप'मध्ये या," असे आवाहन 'आप'ने केले आहे. त्यांच्यासाठी तिकीट आरक्षित असल्याचे 'आप'ने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT