Rahul-Gandhi-Jyotiraditya-Shinde
Rahul-Gandhi-Jyotiraditya-Shinde 
देश

मध्य प्रदेशचा चेहरा राहुल गांधी ठरवतील : अरुण यादव

पीटीआय

शिवपुरी   : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव समोर आलेले असताना मात्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी आज या संदर्भातील निर्णय दिल्लीत होईल, असे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी या संदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे यादव यांनी नमूद केले.


पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले, की कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची परंपरा नाही. ज्योतिरादित्य शिंदे असो किंवा पक्षाचा अन्य कोणताही नेता असो, कॉंग्रेस आताच उमेदवार जाहीर करणार नाही. मध्य प्रदेशचा एखादा चेहरा जाहीर करायचा असेल, तर त्याचा निर्णय राहुल गांधी घेतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि कॅबिनेट मंत्री यशोधरा राजे शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती यादव यांनी दिली. त्यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाले असल्याचे यादव म्हणाले. वेळोवेळी या मंडळींकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे, असाही आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT