Court denies relief Kunal Kamra Sarkarnama
देश

Kunal Kamra : कुणाल कामराला दिलासा द्यायला मद्रास हायकोर्टाचा नकार; मुंबई पोलीस कोणत्याही क्षणी उचलण्याची शक्यता

Mumbai Police Kunal Kamra : अटकेपासून दिलासा किंवा अटक पूर्व जामीन हवा असल्यास अटकपूर्व जामीन याचिका करावी लागेल असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Ganesh Sonawane

Madras HC on Kunal Kamra: कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने 7 एप्रिलपर्यंत अटक करू नये असे सांगून दिलासा दिला होता. आता ही मुदत संपल्यानंतर तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी मुंबई पोलिसांकडून कामराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत एका 'कॉमेडी शो' मध्ये कुमाल कामरा यांनी व्यंगात्मक गाणं गायलं होतं. त्याविरोधात राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. शिवसैनिकांनी त्याचा 'शो' जिथे पार पडला त्या स्टुडीओची तोडफोड केली.

त्यानंतर कामराविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील खार पोलिस ठाण्यात हे गुन्हे वर्ग करण्यात आले आहेत. कुणाल कामराने आज हे सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

कुणाल कामराने याचिकेत म्हटले आहे की, मूलभूत हक्क असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याचा हक्क या कलम 19 व 21 नुसार माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा. कामराच्या या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाने तयारी दाखवली आहे.

पण त्याचवेळी अटकेपासून कोणतेही संरक्षण देता येणार नाही कारण की, ही याचिका गुन्हा रद्द करण्यासाठीची आहे. अटकेपासून दिलासा किंवा अटक पूर्व जामीन हवा असल्यास अटकपूर्व जामीन याचिका करावी लागेल असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी कुणाल कामराने मुंबई पोलिसांना पत्र पाठवले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यात यावा अशी विनंती त्याने पत्रातून मुंबई पोलिसांकडे केली होती.

कुणाल कामराला खार पोलिसांनी आतापर्यंत तीन वेळा समन्स दिला आहे. २ एप्रिलला रोजी तिसरे समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, तो एकदाही चौकशीसाठी हजर झालेला नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार होती, परंतु कामरा यांच्या वकिलाने तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने मंगळवार, 8 एप्रिल 2025 रोजी तातडीची सुनावणी करण्यास परवानगी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT