Rajesh Tope, Sharad Pawar, Pravin Darekar Sarkarnama
देश

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 LIVE : दरेकरांनी सभागृहात थेट शरद पवार, राजेश टोपेंचं नाव घेत केली मोठी मागणी...

Maharashtra assembly Interim Budget session 2024 LIVE updates in Marathi : संगिता वानखेडे यांचा दाखला देत दरेकरांनी विधानपरिषदेत शरद पवारांसह राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले.

Rajanand More

Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Assembly budget session) आजचा दुसरा दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून गाजत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच खडाजंगी सुरू आहे. विधानपरिषदेत भाजपचे आमदार प्रविण दरेकरांनी थेट शरद पवार आणि राजेश टोपे यांचे नाव घेत चौकशीची मागणी केल्यानंतर विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

विधानपरिषदेत प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची तसेच आंदोलनाची एसआयटी चौकशीची मागणी दरेकरांनी केली. ते म्हणाले, अनेक गोष्टी जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत. बारसकर महाराजांनी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीचे प्लॅनिंग राजेश टोपे यांच्या कारखान्यावर झाल्याचे सांगितले आहे. ट्रॅक्टरमधून दगड आणल्याचे ३०७ च्या गुन्ह्यातील आरोपीच म्हणत आहे, त्यांनींच प्लॅनिंग केले आहे. प्लॅनिंग करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा.

महाराष्ट्रात (Maharashtra) जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) मोठ्या सभा झाल्या. जेसीबीने फुलांची उधळण झाली. लाखो रुपये सभांसाठी, जेसीबीसाठी आले कुठून, याचीही चौकशी झाली पाहिजे. कुणी पैसे दिले, कुठून फोन आले, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दरेकरांनी केली. संगिता वानखेडे यांच्या बोलण्याचा संदर्भ देत दरेकर म्हणाले, वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, बारसकर महाराज जे म्हणतात तेच बरोबर आहे. जरांगे कुणालाच विश्वासात घेत नव्हते. एक फोन यायचा, त्यांनाच विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता, असे वानखेडे म्हणाल्याचा मुद्दा दरेकरांनी सभागृहात उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार जरांगे यांना फोन करत होते. आंदोलनाचा सर्व खर्च पवारांनीच केल्याचे कालांतराने बाहेर येईल, असे संगीता वानखेडे यांनी सांगितले आहे. जरांगे यांचे बॅनर लावलेले पवारसाहेबांचे पदाधिकारी होते. बारसकर यांच्याकडे पुरावा आहेत, असे वानखेडे म्हणाल्याचे दरेकरांनी सभागृहात सांगितले. शरद पवार जसे सांगतात, तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाची मारेकरी शरद पवार आहेत. कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे गोंधळ आणि राडा घातला जात आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच जरांगे वागत आहे. अंतरवालीत दंगल का घडवली, याचा सरकारने शोध घ्यावा, असे संगीता वानखेडे म्हणतात, असे दरेकर यांनी सांगितले.

जरांगेंच्या आंदोलनात पवारांचा कसा हात आहे, हे संगीता वानखेडे यांनी सांगितले आहे. राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सर्व षडयंत्र रचले गेले. ट्रॅक्टरमधून दगड आणण्यात आले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दरेकरांनी केली. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. सत्ताधारी आमदार आणि विरोधकांमध्यो जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सभागृह (Maharashtra Assembly) दोनदा तहकूब करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT