Devendra Fadnavis, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Devendra Fadnavis News : फडणवीसांनी एका वाक्यातच राहुल गांधींच्या आरोपांची हवा काढली!

Rahul Gandhi Press Conference Supriya Sule Sanjay Raut News : राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्यांची मागणी केली.

Rajanand More

Mumbai News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारयाद्यांमधील घोळाचा मुद्दा मांडत त्यांनी काही सवाल उपस्थित केले. त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच राहुल यांना सल्लाही दिला आहे.

राहुल गांधी यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर काही वेळातच फडणवीसांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत राहुल गांधींच्या आरोपांची हवा काढली. 'जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!', असे ट्विट करत फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

तसेच फडणवीसांनी मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधींवर पलटवार केला. ते म्हणाले, राहुल गांधी जोपर्यंत पराभवाचे चिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील, तोपर्यंत त्यांना जनतेचे समर्थन कधीच मिळणार नाही.मतदार कुठून आले, कुणाची नावे वगळली, याची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली आहेत. त्यामुळे त्याची वेगळी उत्तरे देण्याची गरज नाही. राहुल गांधींना हे माहिती आहे की, दिल्लीतील निकालानंतर त्यांचे तिथे नामोनिशाण राहणार नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे निकालानंतर काय बोलायचे, कोणते नॅरेटिव्ह तयार करायचे, याची प्रॅक्टिस ते करत आहेत, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

मी सातत्याने हे म्हणालो आहे की, जोपर्यंत ते चिंतन करणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढणार नाही. राहुल गांधींनी आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, असा सल्लाही फडणवीस यांनी राहुल गांधींना दिला. दरम्यान, राहुल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात अचानक वाढलेली मते भाजपला मिळाल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

पाच वर्षांत विधानसभा 2019 आणि लोकसभा 2024 निवडणुकीदरम्यान 32 लाख नवीन मतदार आले. पण पाच महिन्यांत 39 लाख नवे मतदार आले. हे नवे मतदार कोण आहेत, ते अचानक कसे वाढले, हा निवडणूक आयोगाला आमचा प्रश्न आहे.भाजपच्या मतांमध्ये 35 लाख मतांची वाढ झाली. भाजपचा स्ट्राईक रेट 90 टक्के राहिला आहे. इतिहासात एवढा स्ट्राईट रेट कधीच नव्हता, असेही राहुल म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT