BJP sarkarnama
देश

BJP : सर्वोच्च समितीतून गडकरींना वगळले..तर फडणविसांना निवडणूक समितीवर स्थान

BJP : भाजपच्या संसदीय समितीवर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून राज्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळाले आहे, त्यांची केंद्रात एन्ट्री झाली आहे. केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान मिळाले आहे. आज समितीने आपल्या सदस्यांची नावे जाहीर केली. यात फडणवीस यांचा समावेश आहे, समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आहेत.

जे.पी. नड्डा यांनी आज निवडणूक समितीच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पंधरा जणांचा समावेश आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, बी.एस. यडीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, श्री. के लक्ष्मण, एक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायन जटीया आणि बी. एल संतोष आदींचा या समितीमध्ये आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे, त्या निवडणूक समितीमध्ये देखील महत्वाचे निर्णय घेतले जातात. ही समिती निवडणूकीतील तिकीट वाटपासंबंधी निर्णय घेते, या समितीत महाराष्ट्राचे एकमेव नेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे.

नितीन गडकरी, शिवराजसिंग चौहान यांना डावलले..

भाजपसाठी संसदीय समिती ही सर्वोच्च समिती मानली जाते, सर्व महत्वाचे निर्णय हे या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या माध्यमातूनच घेतले जातात, या संसदीय समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय समितीवर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही.

नितीन गडकरी आणि शिवराजसिंग चौहान या नेत्यांना डावलण्यात आले आहे.उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस आणि यांच्या नावाचा समावेश या समितीमध्ये होईल अशी चर्चा होती मात्र त्यांना देखील या समितीमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. अकरा जणांचा या समितीमध्ये समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT