Lok Sabha Election 2024 sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : चौथ्या टप्प्यातील मतदान संपले; देशभरातील 96 मतदारसंघाचे भवितव्य 'EVM'मध्ये कैद!

Lok Sabha Election 2024 Voting LIVE updates in Marathi : जाणून घ्या, कोणत्या लोकसभा मतदारसंघात किती टक्के झाले मतदान?

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज देशभरात एकूण 96 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान करण्याचा कालावधी संपला असून, आता अंतिम आकडेवारी समोर येत आहे. दरम्यान मतदानाची पाच वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली असून महाराष्ट्रात एकूण 52.49 टक्के मतदान झाले होते.

Pune Lok Sabha election 2024 : पुणे अन् शिरूरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी, मावळात किती?

पुणे लोकसभा मतदारसंघ - 44.90

कसबा पेठ विधानसभा - 51.07 टक्के

कोथरूड - 48.91 टक्के

पर्वती - 48.80 टक्के

पुणे कॅन्टोन्मेंट - 44.01 टक्के

शिवाजीनगर - 38.73 टक्के

वडगाव शेरी - 40.50 टक्के

मावळ लोकसभा मतदारसंघ : 46.03

चिंचवड - 43.33 टक्के

कर्जत - 49.04 टक्के

मावळ - 50.12 टक्के

पनवेल - 42.24 टक्के

पिंपरी - 42.20 टक्के

उरण - 55.05 टक्के

शिरूर लोकसभा मतदारसंघ : 43.89 टक्के

आंबेगाव - 53.71 टक्के

भोसरी - 42.24 टक्के

हडपसर - 38.04 टक्के

जुन्नर - 47.31 टक्के

खेड आळंदी - 48.07 टक्के

शिरूर - 41.15 टक्के

Maharashtra Lok Sabha election live : पुणे पट्ट्यात मतदानाची टक्केवारी कमीच, नंदुरबारमध्ये सर्वात जास्त मतदान

  • जळगाव - 51.98 टक्के

  • जालना - 58.85 टक्के

  • नंदुरबार - 60.60 टक्के

  • शिरूर - 43.89 टक्के

  • अहमदनगर - 53.27 टक्के

  • छ. संभाजीनगर - 54.02 टक्के

  • बीड - 58.21 टक्के

  • मावळ - 46.03 टक्के

  • पुणे - 44.90 टक्के

  • रावेर - 55.36 टक्के

  • शिर्डी - 55.27 टक्के

Lok Sabha elections 2024 : देशात पाच वाजेपर्यंत 62.31 टक्के मतदान

  • आंध्र प्रदेश - 68.04 टक्के

  • बिहार - 54.14 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 35.75 टक्के

  • झारखंड - 63.14 टक्के

  • मध्य प्रदेश - 68.01 टक्के

  • महाराष्ट्र - 52.49 टक्के

  • ओडिशा - 62.96 टक्के

  • तेलंगणा - 61.16 टक्के

  • उत्तर प्रदेश - 56.35 टक्के

  • पश्चिम बंगाल - 75.66 टक्के

Pune Lok Sabha election 2024 live : मावळात 36.54 टक्के मतदान, पुणे अन् शिरूरमध्ये किती?

विधानसभा निहाय -

पुणे मावळ लोकसभा मतदारसंघ - 35.61

कसबा पेठ - 35.24 टक्के

कोथरूड - 37.20 टक्के

पर्वती - 138.10 टक्के

पुणे कॅन्टोन्मेंट - 32.71 टक्के

शिवाजीनगर - 33.06 टक्के

वडगाव शेरी - 35.87 टक्के

मावळ लोकसभा मतदारसंघ : 36.54%

चिंचवड - 35.18 टक्के

कर्जत - 38.03 टक्के

मावळ - 37.50 टक्के

पनवेल - 34.93 टक्के

पिंपरी - 33.74 टक्के

उरण - 42.89 टक्के

शिरूर लोकसभा मतदारसंघ : 36.43 टक्के

आंबेगाव - 44.88 टक्के

भोसरी - 32.77 टक्के

हडपसर - 33.17 टक्के

जुन्नर - 41.41 टक्के

खेड आळंदी - 37.76 टक्के

शिरूर - 34.95 टक्के

Maharashtra phase 4 elections voting : पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये मतदानाचा आकडा कमी

  • जळगाव - 42.15 टक्के

  • जालना - 47.51 टक्के

  • नंदुरबार - 49.91 टक्के

  • शिरूर - 36.43 टक्के

  • अहमदनगर - 41.35 टक्के

  • छ. संभाजीनगर - 43.76 टक्के

  • बीड - 46.49 टक्के

  • मावळ - 36.54 टक्के

  • पुणे - 35.61 टक्के

  • रावेर - 45.26 टक्के

  • शिर्डी - 44.87 टक्के

Lok Sabha elections 2024 : देशात तीन वाजेपर्यंत 52.60 टक्के मतदान

  • आंध्र प्रदेश - 55.49 टक्के

  • बिहार - 45.23 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 29.93 टक्के

  • झारखंड - 56.42 टक्के

  • मध्य प्रदेश - 59.63 टक्के

  • महाराष्ट्र - 42.35 टक्के

  • ओडिशा - 52.91 टक्के

  • तेलंगणा - 52.34 टक्के

  • उत्तर प्रदेश - 48.41 टक्के

  • पश्चिम बंगाल - 66.05 टक्के

Maharashtra Lok Sabha election live : महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान पुण्यात, संभाजीनगर, बीडमध्ये किती?

  • जळगाव - 31.70 टक्के

  • जालना - 34.42 टक्के

  • नंदुरबार - 37.33 टक्के

  • शिरूर - 26.62 टक्के

  • अहमदनगर - 29.45 टक्के

  • छ. संभाजीनगर - 32.37 टक्के

  • बीड - 33.65 टक्के

  • मावळ - 27.14 टक्के

  • पुणे - 26.48 टक्के

  • रावेर - 32.02 टक्के

  • शिर्डी - 30.49 टक्के

Lok Sabha election 2024 : देशात 40 टक्के मतदान, कुठल्या राज्यात किती मतदान?

  • आंध्र प्रदेश - 40.26 टक्के

  • बिहार - 34.44 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 23.57 टक्के

  • झारखंड - 43.80 टक्के

  • मध्य प्रदेश - 48.52 टक्के

  • महाराष्ट्र - 30.85 टक्के

  • ओडिशा - 39.30 टक्के

  • तेलंगणा - 40.38 टक्के

  • उत्तर प्रदेश - 39.68 टक्के

  • पश्चिम बंगाल - 51.87 टक्के

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : सर्वाधिक मतदान कसबा-कोथरुडमध्ये; कोण मारणार बाजी?

मतदारसंघनिहाय 1 वाजेपर्यंतचं मतदान -

कसबा पेठ - 31.10%

कोथरूड - 29.10%

पर्वती - 27.14%

पुणे कॅन्टोन्मेंट - 23.21%

शिवाजीनगर - 23.26%

वडगाव शेरी - 24.85%

Raver Lok Sabha election 2024 live : एकनाथ खडसेंनी कुटुंबासह केलं मतदान

ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे, रावेरमधील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

eknath khadse voting

Pune Lok Sabha election 2024 news : मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी आणि मुलीसह मतदान केलं आहे.

murlidhar mohol

Pune Lok Sabha election 2024 news :  पुणे लोकसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत 16.16 टक्के मतदान - 

विधानसभा निहाय -

कसबा पेठ - 18.10 टक्के

कोथरूड - 18.20 टक्के

पर्वती - 17.74 टक्के

पुणे कॅन्टोन्मेंट - 13.89 टक्के

शिवाजीनगर - 13.94 टक्के

वडगाव शेरी - 14.67 टक्के

मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %

चिंचवड - 14.93 टक्के

कर्जत - 14.27 टक्के

मावळ - 14.75 टक्के

पनवेल - 14.79 टक्के

पिंपरी - 13.09 टक्के

उरण - 17.67 टक्के

शिरूर लोकसभा मतदारसंघ : 14.51 टक्के

आंबेगाव - 18.47 टक्के

भोसरी - 12.79 टक्के

हडपसर - 14.40 टक्के

जुन्नर - 17.06 टक्के

खेड आळंदी - 14.54 टक्के

शिरूर - 12.25 टक्के

Maharashtra election news : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 17.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

  • जळगाव - 16.89 टक्के

  • जालना - 21.35 टक्के

  • नंदुरबार - 22.12 टक्के

  • शिरूर - 14.51 टक्के

  • अहमदनगर - 14.74 टक्के

  • छ. संभाजीनगर - 19.53 टक्के

  • बीड - 16.62 टक्के

  • मावळ - 14.87 टक्के

  • पुणे - 16.16 टक्के

  • रावेर - 19.03 टक्के

  • शिर्डी - 18.91 टक्के

Lok Sabha elections 2024 update : देशात 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये...

देशात 11 वाजेपर्यंत 24.87 टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली.

  • आंध्र प्रदेश - 23.10 टक्के

  • बिहार - 22.54 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 14.94 टक्के

  • झारखंड - 27.40 टक्के

  • मध्य प्रदेश - 32.38 टक्के

  • महाराष्ट्र - 17.51 टक्के

  • ओडिशा - 23.28 टक्के

  • तेलंगणा - 24.31 टक्के

  • उत्तर प्रदेश - 27.12 टक्के

  • पश्चिम बंगाल - 32.78 टक्के

Lok Sabha election 2024 voting live : वाय. एस. शर्मिला यांनी बजावला मतदानाचा हक्क

आंध्रप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा कडप्पा मतदारसंघातील उमेदवार वाय. एस. शर्मिला यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्याविरोधात टीडीपीनं सी.बी.एस रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तर वाएसआयरसीपीचे विद्यमान खासदार अविनाश रेड्डी हे सुद्धा येथून पुन्हा निवडणूक लढत आहेत.

Lok Sabha election phase 4 voting live : काँग्रेसचे बॅनर लावून मतदान चिठ्ठीचे वाटप, हेमंत रासनेंचं आंदोलन

पुण्यातील राजकीय गोंधळ थांबेना. मतदान केंद्राबाहेर काँग्रेसचे बॅनर लावून मतदान चिठ्ठीचे वाटप करत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे यावर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी करत भाजप नेते हेमंत रासने यांचे आंदोलन केलं.

Shirur Lok Sabha election 2024 news : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी परिवारासह आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी निघण्यापूर्वी कोल्हे यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कोल्हे मळ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला. डॉ. कोल्हे म्हणाले, "रात्रभर अनेक ठिकाणाहून पैसे वाटप होत असल्याचा तक्रारी आलेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही. विरोधकांवर जेव्हा अश्या पध्दतीने मतं विकत घेण्याची वेळ येत असेल तर चित्र स्पष्ट आहे."

Jalgaon Lok Sabha elections 2024 : गिरीश महाजन यांनी कुटुंबासह केलं मतदान

मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे पत्नी आणि कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

girish mahajan voting

Celebrity voting Lok Sabha Election 2024 : मराठी अभिनेते, गायक, अभिनेत्रींनी केलं मतदान

गायक राहुल देशपांडे, अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री श्रृती मराठे, गायिका बेला शेंडे, अभिनेता मोहन आगाशे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Chhatrapati Sambhajianagr Lok Sabha election 2024 : अंबादास दानवेंनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क 

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहकुटुंब अजबनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

ambadas danve voting

Sanjay Raut News : मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात मोठ-मोठ्या बॅगा आल्या, राऊतांचा आरोप

"नाशिकमध्ये पोलिसांकडून पैशांचं वाटप करण्यात येत आहे. राज्यातील पैशांचं वाटप ईडीला दिसत नाही का? 12 ते 13 कोटी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकप्रमाणे शिर्डीतही पैसे वाटले आहेत. एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यात मोठ-मोठ्या बॅगा आल्यात. कुणाला पैशांचं वाटप केलं हे आम्ही जाहीर करू," असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Pune Lok Sabha election 2024 : पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान -

  • कसबा पेठ विधानसभा - 6.93 टक्के

  • कोथरूड - 7.59 टक्के

  • पर्वती - 6.99 टक्के

  • पुणे कॅन्टोन्मेंट - 5.69 टक्के

  • शिवाजीनगर - 6.46 टक्के

  • वडगाव शेरी - 5.90 टक्के

मावळ लोकसभा मतदारसंघ : 5.38 टक्के.

चिंचवड - 6.90 टक्के

कर्जत - 5.15 टक्के

मावळ - 3.41 टक्के

पनवेल - 5.23 टक्के

पिंपरी - 4.33 टक्के

उरण - 6.48 टक्के.

शिरूर लोकसभा मतदारसंघ : 4.97 टक्के.

आंबेगाव - 6.64 टक्के

भोसरी - 4.21 टक्के

हडपसर - 5.23 टक्के

जुन्नर - 5.49 टक्के

खेड आळंदी - 4.63 टक्के

शिरूर - 4.32 टक्के

Lok Sabha elections 2024 update : जम्मू-काश्मीर अन् महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात 10.35 टक्के मतदान झालं आहे. जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

  • आंध्र प्रदेश - 9.05 टक्के

  • बिहार - 10.18 टक्के

  • जम्मू-काश्मीर - 5.07 टक्के

  • झारखंड - 11.78 टक्के

  • मध्य प्रदेश - 14.97 टक्के

  • महाराष्ट्र - 6.45 टक्के

  • ओडिशा - 9.23 टक्के

  • तेलंगणा - 9.51 टक्के

  • उत्तर प्रदेश - 11.67 टक्के

  • पश्चिम बंगाल - 15.24 टक्के

Lok Sabha election 2024 phase 4 : नंदूरबारमध्ये सर्वाधिक तर नगरमध्ये कमी मतदान

सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रात 6.45 टक्के मतदान झालं आहे. तर, सर्वाधिक मतदान नंदूरबार मतदारसंघात झालं आहे.

  • जळगाव - 6.14 टक्के

  • जालना - 6.88 टक्के

  • नंदुरबार - 8.43 टक्के

  • शिरूर - 4.97 टक्के

  • अहमदनगर - 5.13 टक्के

  • छ. संभाजीनगर - 7.52 टक्के

  • बीड - 6.72 टक्के

  • मावळ - 5.38 टक्के

  • पुणे - 6.61 टक्के

  • रावेर - 7.14 टक्के

  • शिर्डी - 6.83 टक्के

Chandrakant Patil On Lok Sabha Election 2024 : आम्ही 'वनवे' जातोय, चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त विश्वास

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मतदानाचा हक्क बजावला आहे. "संपूर्ण पुण्यामध्ये मतदारांमध्ये उत्साह आहे. लवकर उठून नागरिक मतदानाला आलेले आहेत. मतदारांची देह बोली लक्षात येत आहे, ते भाजपला मतदान करत असल्याचे आमच्या लक्षात येत आहे. आम्ही वनवे जात आहोत. मजबूत सरकारचे फायदे गेल्या दहा वर्षात नागरिकांनी पाहिलेले आहेत. उमेदवाराचा वैयक्तिक करिष्मा महापालिका निवडणुकीत वगैरे असतो," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

chandrakant patil

Ahmednagar 2024 Lok Sabha elections : नगरमध्ये 'प्रसाद' अन् 'मालक'मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याचं पाकिटातून निवेदन, रोहित पवारांचा आरोप

"नगर दक्षिण मतदारसंघात आज 'राजा' असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा 'प्रसाद' आणि 'मालक'मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे. गंमत म्हणजे अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत 'यंत्रणे'ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला... आता 'प्रसादात'ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा 'राजा' कसा उदार होणार?" असं ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

2024 Lok Sabha election : असदुद्दीन ओवैसींनी बजावला मतदानाचा हक्क

हैदराबादमधील 'एमआयएम'चे अध्यक्ष आणि उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांनी मदतानाचा हक्क बजावला आहे.

Lok Sabha elections 2024 update : इम्तियाज जलील, सोनवणे अन् आढळराव-पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगरमधील MIM चे उमेदवार इम्तियाज जलील, बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे, शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव-आढळराव पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मतदान केलं आहे.

Lok Sabha election 2024 : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बजावला मतदाना हक्क

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. "माझ्या राजकीय कारकिर्दीत मी एवढी गर्दी कधीच पाहिली नाही. अमेरिका, बेंगळुरू, चेन्नई येथून लोक मतदान करण्यासाठी आले आहेत," असं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं.

Maval Lok Sabha election 2024 : मतदार यावेळेस निश्चितच बदल करतील, वाघेरेंनी व्यक्त केला विश्वास

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज सकाळी पिंपरी वाघेरे येथील महात्मा फुले महाविद्यालय मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार यावेळेस निश्चितच बदल करतील, असा विश्वास संजोग वाघेरे पाटील यांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

Pune Lok Sabha election 2024 news : पुण्यातील वडगाव शेरीत EVM मशिन बंद पडलं

पुण्यातील वडगाव शेरी भागातील मतदान केंद्रावर नागरिक खोळंबले. पुणे इंटरनॅशन स्कूल येथील केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले नागरिक गेल्या अर्ध्या तासापासून रांगेत उभे आहेत. ईव्हीएम चालत नसल्यानं नागरिकांचा खोळंबा झाला आहे. प्रशासनासकडून दुसरे ईव्हीएम मशीन आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Ahmednagar Lok Sabha election 2024 news : बाळासाहेब थोरात यांनी पत्नीसह केलं मतदान

काँग्रेसचे जेष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघातील जोर्वे गावात सपत्नीक केले मतदान केलं आहे. मुलगी जयश्री थोरातांचेही जोर्वे गावात मतदान केलं आहे.

Lok Sabha election 2024 live : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुननं बजावला मतदानाचा हक्का, जनतेला म्हणाला...

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुननं हैदराबादमध्ये हक्क बजावला आहे. आपण कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला पाठिंबा देत नाही. तसंच, उन्हाळा असल्यानं मोठ्या संख्येनं जनतेनं बाहेर पडून मतदान करावं. आजचा दिवस पुढील पाच वर्षांसाठी महत्त्वाच आहे, असं अल्लू अर्जुननं म्हटलं. .

Raver Lok Sabha elections 2024 : रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी आपल्या कुटुंबासह रावेर येथील मतदान क्रमांक 95 वर मतदान केले.

Ahmednagar Lok Sabha elections 2024 news : बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस

हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा? पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्वीट करत विचारण्यात आला.

Lok Sabha elections 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मतदानाचं आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान होत आहे. मला विश्वास आहे, सर्व जागांवर लोक मोठ्या संख्येने मतदान करतील, ज्यामध्ये तरुण आणि महिला मतदार उत्साहाने सहभागी होतील. आपले कर्तव्य बजावून लोकशाही बळकट करूया, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha election 2024 news : संदीपान भुमरेंनी पाचोड्यात केलं मतदान 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मतदान केले आहे.

sandipan bhumare

Ahmednagar Lok Sabha election 2024 live :  ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतलीय, नीलेश लंके

नीलेश लंके यांनी हांगे या गावात मतदानाचा हक्क बजावला आहे. "ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, अशी आहे. ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असून या निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरूपयोग करण्यात आला," असा आरोप नीलेश लंके यांनी केला आहे.

Jalna Lok Sabha election 2024 live : आम्ही राज्यात 45 जागा जिंकू - रावसाहेब दानवे 

मी विरोधकांवर एकही आरोप केला नाही. माझ्याकडे सांगायला विकासाची खूप काम होती. राज्यातील हिंदुत्ववादी मतदारांनी भाजपला सोडलेलं नाही. आम्ही राज्यात 45 जागा जिंकू. आमच्याविरोधात सगळे विरोधक आहेत. तर, आम्ही त्यांना यशस्वीपणे तोंड देतो, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

raosaheb danve

Lok Sabha election 2024 : देशातील 10 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, मावळ, शिरूर, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघामध्येही मतदान पार पडत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT