Kunal Raut Latest Marathi News, Congress Latest Marathi News
Kunal Raut Latest Marathi News, Congress Latest Marathi News Sarkarnama
देश

कुणाल राऊतांची पक्ष शिबीराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी! भाजपकडून व्हिडीओ व्हायरल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नेपाळमधील एका पबमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून भाजपने त्यांच्या जोरदार टीका केली होती. आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांच्या माध्यमातून शिबिराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी आयोजित करण्यात आली होती, असा दावा भाजपने केला आहे. तसेच या पार्टीचा व्हिडीओही ट्विट करण्यात आला आहे. (Congress Latest Marathi News)

कुणाल राऊत यांची नुकतीच अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या शिबीरातील हा व्हिडीओ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या व्हिडीओ 24 सेकंदाचा असून त्यामध्ये 'पीले पीले ओह मेरे जानी' या हिंदी चित्रपट गीतावर धांगडधिंगा सुरू असल्याचे दिसते.

जसा राजा तसा पक्ष अशी टीका करत पूनावाला म्हणाले, महाराष्ट्र सरकार एकापाठोपाठ एक मुद्यांचा सामना करत आहे. लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे. या मुद्यांवर आवाज उठवण्याऐवजी युवा नेते प्रशिक्षण शिबीरात पार्टी करत आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनीही टीका केली आहे. काँग्रेस ची पेज ३ संस्कृती पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या माध्यमातून शिबिराच्या नावाखाली धांगडधिंगा पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक अनैतिक गोष्टी घडल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

करोडो रुपये खर्च करून मिळविलेले अध्यक्ष पद, त्यात वडिलांच्या सरकारी खात्याचा केलेला दुरुपयोग, करोडो रुपये खर्च करून स्वतःचा करून घेतलेला पदग्रहण सोहळा आणि आता करोडो रुपये खर्च करून केलेल्या या अनैतिक धांगडधिंगा पार्ट्या या सर्व विषयाच्या तारा थेट ऊर्जा खात्याशी जुळल्या आहेत का? ऊर्जा खात्यातील कंत्राटदारांची पिळवणूक करून या करोडो रुपयांची तरतूद केली गेली का? या सर्व विषयांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT